Categories: Uncategorized

दिवाळी का साजरी केली जाते ? पाहू या काय आहे, प्रत्येक दिवसाचे महत्त्व…

*|| शुभ दीपावली ||*

दिवाळी सण मोठा … नाही आनंदा तोटा ..

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १० नोव्हेंबर) : खरं तर आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण दीपावली, ज्याला आपण दिवाळी म्हणतो .. आपण प्रथम पाहू दिवाळी का साजरी केली जाते ?
बऱ्याच देशवासियांना माहीतच नाही का साजरी करतात हा फक्त दिवे लावणे, फराळ, आणि फटाके फोडणे, लक्ष्मी पूजन करणे, बस हीच आहे दिवाळी ? … नाही याला एक विलक्षण महत्व आहे …ऐतिहासिक , धार्मिक व सामाजिक .

दिवाळी हा सण हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी प्रभु श्रीराम, बंधू लक्ष्मण आणि सितामाता यांच्यासोबत १४ वर्षाचा वनवास संपल्यानंतर अयोध्येत परत आले होते.
अयोध्या नगरीमध्ये जेव्हा हे कळले की प्रभु श्रीरामाने रावणाचा अंत केला आहे आणि अयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत तेव्हा पूर्ण अयोध्येमधल्या लोकांनी त्या जल्लोषात दसऱ्यापासूनच रांगोळी आणि दिव्यांनी अयोध्या सजवली होती.

जेव्हा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा अंत झाला त्याच्याबरोबर २१ दिवसांनी श्रीराम हे अयोध्येत पोहोचले होते तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो म्हणजे लाखो वर्षांपासूनची ही परंपरा अजूनही हिंदू बांधव साजरी करतात. विशेष। म्हणजे दिवाळीला प्रभु श्रीराम यांच्या जागी महालक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा का केली जाते.दिवाळी हा सण ५ दिवस चालणारा सण आहे आणि याच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे. आता प्रथम आपण
या ५ दिवसाचं महत्त्व जाणून घेऊ

१:- पहिला दिवस आहे धनत्रयोदशी :-

पूर्वीच्या मान्यतेनुसार सगळ्या देवांनी असुरांसोबत समुद्रमंथन केलं होतं तेव्हा समुद्रातून १४ रत्न निघाले. याच्यातील एक आहे भगवान धन्वंतरी. आपल्या पंचांगानुसार पितृपक्षाच्या १३ दिवसांनंतर भगवान धन्वंतरी हे समुद्रातून हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत. त्यांनीच पूर्ण संसाराला आयुर्वेदाची ओळख करून दिली. त्यादिवसांपासून या दिवसाला धनतेरस, धनत्रयोदशी असे नांव पडले आणि भगवान धन्वंतरी यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो.

२:- दिवाळीचा दुसरा दिवस आहे नरकचतुर्दशी.

एके काळी या संसारात भूमिपुत्र नरकासुराचा आतंक होता, त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू फक्त त्याच्या आईच्या हातानेच होऊ शकतो. पुढच्या जन्मात भूमिदेवीने सत्यभामाच्या रूपात अवतार घेतला, सत्यभामेचे लग्न भगवान श्रीकृष्णासोबत झाले. त्यानंतर सत्यभामेने नरकासुराचा अंत केला.
तेव्हापासून आजपर्यंत त्या दिवसाला नरकचतुर्दशी या नावाने ओळखलं जातं.

३:- दिवाळीचा तिसरा दिवस आहे लक्ष्मीपुजन.

देव आणि दैत्य जेव्हा समुद्र मंथन करत होते तेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाली होती. तेव्हापासून त्या दिवशी आपल्या घरी भरपूर यश, सुख आणि संपत्तीसाठी माता लक्ष्मी यांची पुजा होते.

दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी यांच्यासोबत श्री गणेश यांची सुध्दा पुजा होते.
पुरातन मान्यतेनुसार महालक्ष्मीला कोणतेही संतान नव्हते आणि माता पार्वतीचे २ पुत्र होते.

लक्ष्मीने पार्वतीजवळ श्री गणेश यांना दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली. पार्वतीला चिंता होती की लक्ष्मी कधीच एका जागी थांबत नाही. मग गणपतीची काळजी ती कशी घेईल. याच्यावर लक्ष्मी म्हणाली की मी जिथे जाईन तिथे गणपतीला सोबतच घेऊन जाईन.
म्हणून तेव्हापासून
जिथे लक्ष्मीची तिथे गणपतीची सुध्दा पुजा होते.

खरंतर दिवाळीच्या दिवशी श्रीराम अयोध्येत आले होते परंतु या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पुजा होते.
पुरातन ग्रंथानुसार त्यावेळी भगवान विष्णू हे आराम करतात आणि श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत. त्यामुळे श्रीराम यांची पुजा केली जात नाही.

४- बलिप्रतिपदा .. अश्विन अमावस्येला लक्ष्मीपुजन झाल्यानंतर बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा होतो.
साडे तीन मुहूर्तांपैकी एक हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
अक्षयतृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्ध मुहूर्त आहे. यादिवशी सोने खरेदी, सुवासिनी कडून पतिला ओवाळले जाते.
असे खूप काही महत्त्व आहेत
व्यापारी लोकांचे नविन वर्ष याच पाडव्यापासून सुरू होते.

हिशोबाच्या नविन वह्या ज्याला खतावणी म्हणतात त्यांचे पुजन करून नवीन सुरूवात केली जाते.
कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो.

५:- दिवाळीचा पाचवा दिवस आहे गोवर्धन पुजा.

रामायणानुसार जेव्हा श्री राम हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतूचे बांधकाम करत होते तेव्हा सगळे वानर हे आप आपल्या शक्तीनुसार दगड जमा करत होते तेव्हा हनुमानजीनी हा सेतू बांधण्यासाठी गोवर्धन पर्वतच उचलून आणला होता.
परंतु ते यायच्या आतच सेतूचं काम झालं होतं. सेतूमध्ये मदत नाही करता आली म्हणून गोवर्धन पर्वताने त्याचं दुःख श्रीरामांकडे प्रकट केलं. श्री राम यांनी वचन दिलं की पुढच्या जन्मात ते त्या पर्वताचा उपयोग नक्की करतील.
आणि हनुमंताला सांगितले की हा पर्वत पुन्हा त्या जागी ठेवून ये.
पुढच्या जन्मात जेव्हा भगवंतांनी कृष्ण अवतार घेतला तेव्हा गावातील लोकांना गोवर्धनाची पुजा करण्यास सांगितली.
याला नाराज होऊन इंद्राने गोवर्धन पर्वतावर आक्रमण केले. तेव्हा श्रीकृष्णाने लोकांना वाचवण्यासाठी पर्वत करंगळीवर उचलला आणि इंद्राचा गर्व मोडला.
तेव्हापासून गोवर्धनाची पुजा केली जाते.

६:- सहावा दिवस आहे भाऊबीज
यादिवशी देवता यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला त्यांच्या घरी गेले.
त्यांच्या बहिणीकडून झालेला आदर सत्कार पाहून ते खूप प्रसन्न झाले. तेव्हा यमराजांनी हे वरदान दिले की या दिवशी जो भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो.
यादिवशी सगळ्या बहिणी तिच्या भावाच्या सुरक्षेची देवाला प्रार्थना करतात.

(टीप :- या लेखात दिलेल्या कोणत्याही गोष्टीची ‘महाराष्ट्र 14 न्यूज’ पुष्टी करत नाही.)

*हि दीपावली आपणांस आणि आपल्या कुटुंबास*
*आंनदाची आणि भरभराटीची जावो.️*

●┈┉❀꧁꧂❀┉┈●

●┈┉❀꧁꧂❀┉┈●

●┈┉❀꧁꧂❀┉┈●

Maharashtra14 News

Recent Posts

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राबवत असलेल्या उपक्रमांची पाहणी…

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…

3 days ago

पुणे जिल्हा अथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने पहिल्यांदाच सांगवी येथे सौ.सारिका कृष्णा भंडलकर यांच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…

2 weeks ago

१५ ते १७ एप्रिल या कालावधीत पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहरासाठी …. महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…

2 weeks ago

पुणे मेट्रोच्या नावात पिंपरी चिंचवड नावाचा समावेश करा – आमदार शंकर जगताप

पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…

3 weeks ago

पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौक येथील सबवेच्या कामाला गती; विहीत मुदतीत काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…

3 weeks ago

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…

1 month ago