Google Ad
Editor Choice

Mumbai : शरद पवारांच्या निवासस्थानी का झाली पवार – फडणवीस भेट ? : वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज : विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांचे मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओक याठिकाणी फडणवीस शरद पवारांना भेटले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा फोटो ट्वीट करून, माहिती देताना म्हटले की, “माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.” राज्यात कोरोनाचं संकट, परीक्षांचे आयोजन, मराठा आरक्षण, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान अशा अनेक गोष्टी घडत आहेत. यासंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र महाविकास आघाडीचे सर्व नेते मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनात असताना दुसरीकडे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

196 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!