Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष ‘प्रशांत शितोळे’ यांचा आक्रमक पवित्रा … टेक महिंद्रा व सहकारी कंपनीचे काम तातडीने थांबवून त्यांना काळ्या यादीत टाकण्या बाबत का केली मागणी?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८मे) : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. या पिंपरी चिंचवड शहरासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत काम करणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीच्या कामांमध्ये मोठा घोटाळा आहे, हे काम करणाऱ्या गद्दार असणाऱ्या टेक महिंद्रा व सहकारी कंपनीचे काम तातडीने थांबवून त्यांना काळ्या यादीत टाकण्या बाबत कार्यवाहीची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात प्रशांत शितोळे यांनी म्हटले आहे की, टेक महिंद्रा कंपनीने पिंपरी-चिंचवड शहराचा पाच कोटी रुपयांचा डेटा चोरीला गेला व तो डेटा चोरीला गेला नाही या दोन वाक्यातच दिसून येतो.

Google Ad

मुळातच टेक महिंद्रा या कंपनीला क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विस प्रा. लि. व आरकेस इन्फोटेक प्रा. लि. या दोन कंपन्या भागीदार असून यातील एका कंपनीत काही मालकी मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारांच्या घरातील दिसते त्यामुळे आमच्या शहरातील नागरिकांचा डेटा उद्याच्या काळात जगजाहीर होऊन भाजपाईना खिरापती सारखा वाटला जाणार आहे यात आम्हाला शंका वाटत नाही.

टेक महिंद्रा या कंपनीवर पिंपरी-चिंचवड ने कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न तयार होतो. भविष्यात या कामाचे 5 वर्ष देखभाल-दुरुस्ती हीच कंपनी करणार आहे. त्यामुळे असे खोटे सांगणाऱ्या कंपनीवर प्रशासन म्हणून कितपत विश्वास ठेवणार हे तुम्हाला स्पष्ट करावे लागणार आहे.

टेक महिंद्रा कंपनीच्या ताब्यात सीसीसी म्हणजे कमांड कंट्रोल सेंटर याचा अर्थ शहरातील प्रत्येक गोष्टीची नोंद व नजर ही या कंपनीच्या ताब्यात आहे. त्यामुळे आपल्या शहरवासीयांना खोट्या तक्रार दिलेल्या गद्दार कंपनीच्या तांत्रिक गोष्टींमध्ये अडकून राहावे लागणार आहे व शहराचा गोपनीय वाटणारा अतिशय मोठा व महत्त्वाचा डेटा ही कंपनी इतरांनासुद्धा का विकू शकणार नाही किंवा का वाटू शकणार नाही? अशी शंका व खात्री आहे. त्यातच कोरोना बाबत उपलब्ध असणारा डेटा चोरणे बाबत खलबते चालू असतात असे समजते. याचीही जबाबदारी द्यावी.

शहरातील नागरिकांच्या डेटा बाबतची जबाबदारी प्रशासन म्हणून आपण घेणार किंवा दुसर्‍या कोणावर सोपवणार त्याचेही नाव जाहीर करावे.

टेक महिंद्रा या कंपनीने पोलिसात तक्रार करताना बिटकॉईन स्वरूपात खंडणी मागितली व डेटा चोरीला गेला अशी तक्रार १/३/२०२१ रोजी केली होती चोरीला गेला नाही अशी माहिती ५/५/२०२१ रोजी दिली. पण बिटकॉइन मागितले त्याचे काय? या सर्व घटनेचा तपास पोलिस करतीलच.

टेक महिंद्राच्या श्री. नितीन बियाणी यांनी महानगरपालिकेची दिशाभूल केली आहे व पोलिसांची सुद्धा फसवणूक केली आहे. त्यामुळे श्री. नितीन बियाणी व टेक महिंद्रा कंपनीवर सरकारी कामात अडथळा, सरकारी वेळेचा अपव्यय, सरकारी पैशाचे नुकसान, सरकारी यंत्रणेची फसवणूक, महानगरपालिका, राज्य, शासन व केंद्र शासन यांची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करावा व त्यांना पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड च्या टेक महिंद्रा, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रा. लि. व आरकेस इन्फोटेक प्रा. लि. या तीनही कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे म्हणून प्रशांत शितोळे यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!