राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष ‘प्रशांत शितोळे’ यांचा आक्रमक पवित्रा … टेक महिंद्रा व सहकारी कंपनीचे काम तातडीने थांबवून त्यांना काळ्या यादीत टाकण्या बाबत का केली मागणी?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८मे) : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. या पिंपरी चिंचवड शहरासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत काम करणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीच्या कामांमध्ये मोठा घोटाळा आहे, हे काम करणाऱ्या गद्दार असणाऱ्या टेक महिंद्रा व सहकारी कंपनीचे काम तातडीने थांबवून त्यांना काळ्या यादीत टाकण्या बाबत कार्यवाहीची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष ‘प्रशांत शितोळे’ यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात प्रशांत शितोळे यांनी म्हटले आहे की, टेक महिंद्रा कंपनीने पिंपरी-चिंचवड शहराचा पाच कोटी रुपयांचा डेटा चोरीला गेला व तो डेटा चोरीला गेला नाही या दोन वाक्यातच दिसून येतो. मुळातच टेक महिंद्रा या कंपनीला क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विस प्रा. लि. व आरकेस इन्फोटेक प्रा. लि. या दोन कंपन्या भागीदार असून यातील एका कंपनीत काही मालकी मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारांच्या घरातील दिसते त्यामुळे आमच्या शहरातील नागरिकांचा डेटा उद्याच्या काळात जगजाहीर होऊन भाजपाईना खिरापती सारखा वाटला जाणार आहे यात आम्हाला शंका वाटत नाही.

टेक महिंद्रा या कंपनीवर पिंपरी-चिंचवड ने कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न तयार होतो. भविष्यात या कामाचे 5 वर्ष देखभाल-दुरुस्ती हीच कंपनी करणार आहे. त्यामुळे असे खोटे सांगणाऱ्या कंपनीवर प्रशासन म्हणून कितपत विश्वास ठेवणार हे तुम्हाला स्पष्ट करावे लागणार आहे.

टेक महिंद्रा कंपनीच्या ताब्यात सीसीसी म्हणजे कमांड कंट्रोल सेंटर याचा अर्थ शहरातील प्रत्येक गोष्टीची नोंद व नजर ही या कंपनीच्या ताब्यात आहे. त्यामुळे आपल्या शहरवासीयांना खोट्या तक्रार दिलेल्या गद्दार कंपनीच्या तांत्रिक गोष्टींमध्ये अडकून राहावे लागणार आहे व शहराचा गोपनीय वाटणारा अतिशय मोठा व महत्त्वाचा डेटा ही कंपनी इतरांनासुद्धा का विकू शकणार नाही किंवा का वाटू शकणार नाही? अशी शंका व खात्री आहे. त्यातच कोरोना बाबत उपलब्ध असणारा डेटा चोरणे बाबत खलबते चालू असतात असे समजते. याचीही जबाबदारी द्यावी.

शहरातील नागरिकांच्या डेटा बाबतची जबाबदारी प्रशासन म्हणून आपण घेणार किंवा दुसर्‍या कोणावर सोपवणार त्याचेही नाव जाहीर करावे. टेक महिंद्रा या कंपनीने पोलिसात तक्रार करताना बिटकॉईन स्वरूपात खंडणी मागितली व डेटा चोरीला गेला अशी तक्रार १/३/२०२१ रोजी केली होती चोरीला गेला नाही अशी माहिती ५/५/२०२१ रोजी दिली. पण बिटकॉइन मागितले त्याचे काय? या सर्व घटनेचा तपास पोलिस करतीलच.

टेक महिंद्राच्या नितीन बियाणी यांनी महानगरपालिकेची दिशाभूल केली आहे व पोलिसांची सुद्धा फसवणूक केली आहे. त्यामुळे नितीन बियाणी व टेक महिंद्रा कंपनीवर सरकारी कामात अडथळा, सरकारी वेळेचा अपव्यय, सरकारी पैशाचे नुकसान, सरकारी यंत्रणेची फसवणूक, महानगरपालिका, राज्य, शासन व केंद्र शासन यांची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करावा व त्यांना पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड च्या टेक महिंद्रा, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रा. लि. व आरकेस इन्फोटेक प्रा. लि. या तीनही कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे म्हणून प्रशांत शितोळे यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago