Google Ad
Editor Choice Pune

का दिला, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपे यांनी पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा …

महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपे यांनी पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. एक व्यक्ती एक पद, धोरणानुसार राजीनामा देत असल्याचे तुपे यांनी म्हटले आहे. सुमारे तीन वर्षे तुपे शहराध्यक्षपदावर होते. पक्षाच्या नव्या शहराध्यक्षांची निवड १ मे रोजी जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चेतन तुपे हे शहराध्यक्ष पदावर असतानाच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीत तुपे आणि वडगाव शेरी मतदारसंघातून सुनील टिंगरे असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन आमदार निवडून आले आहेत. तर, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांचा सुमारे दोन हजार मतांनी पराभव झाला होता.

Google Ad

तत्पूर्वी ऑगस्ट २०१८ पासून पक्षाने त्यांच्याकडे पुणे शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने सोपविली होती. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तुपे यांनी आठही विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले होते. विधानसभा निहाय कार्यकारीणीही तयार झाली होती. तसेच विविध फ्रंटलचे अध्यक्ष निवडण्यात आणि त्यांना सक्रिय करण्यात तुपे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तुपे आमदार झाल्यापासून शहराध्यक्षपदावर नवा चेहरा येईल, अशी पक्ष वर्तुळात चर्चा होती.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

50 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!