Google Ad
Uncategorized

Pune : प्रत्येक वेळेला या माणसाला टोलची कंत्राटं मिळतात तो कुणाचा लाडका आहे? : राज ठाकरे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ जुलै) : राज ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुणे शहरातील शाखाध्यक्षांच्या कामांचा यावेळी त्यांनी आढवा घेतला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी टोलच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. अमित ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत आहे. तो टोल फोडत चालला नाही. एखाद्या नाक्यावर हा प्रसंग घडला असेल. गाडीला फास्टॅग असूनही त्याला थांबवलं. टोल भरल्याचंही त्याने सांगितलं. संबंधित माणसाचा व्हॉकीटॉकी सुरू होता. तो उद्धटपणे बोलत होता. त्यावर पुढची रिअॅक्शन आली, असं राज ठाकरे म्हणाले.

भाजपने यावर बोलण्यापेक्षा टोलमुक्त महाराष्ट्र करू हे भाजपने निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं त्याचं काय झालं ते भाजपने सांगावं ना. प्रत्येक वेळेला म्हैस्कर नावाच्या माणसाला टोलची कंत्राटं मिळतात तो कुणाचा लाडका आहे? टोलची प्रकरणं तरी काय आहेत?, असा सवाल त्यांनी केला. समृद्धी महामार्गावर झालेली घटना तुम्हाला माहीतच आहे. मुंबई-पुणे महामार्गावर दोन्ही बाजूला फेन्सिंग टाकलं गेलं. तसं समृद्धी महामार्गावर टाकलं नाही. त्यामुळे आतापर्यंत अपघातात 400 लोकं मृत्यूमुखी पडले. त्याची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार का? असा सवाल त्यांनी केला.

Google Ad

अजून काय म्हणाले, राज ठाकरे :-

अख्खा समृद्धी महामार्ग फेन्सिंग न लावता मोकळा केला. त्यावर कुत्रे, गायी, हरणं येत आहेत. ज्या स्पीडला लोकं जाणार गाड्या घेऊन, ट्रक घेऊन, तर अपघातात मरणार. ही सरकारची जबाबदारी नाही का? सरकारने प्रिकॉशन्स घ्यायला नको होती का? त्या आधी टोल बसवता. लोकांच्या जगण्यामरण्याचं काही घेणंदेणं नाही. रस्ता बनवला तर टोल पाहिजे यांना, असा हल्ला त्यांनी चढवला.मीडियाला प्रश्न :-

रस्त्याची अवस्था घाणेरडी आहे. मुंबई-पुण्याचा टोल बंद होता. या महामार्गावरून येण्यासाठी सहा सहा तास लागतात. सर्व ठिकाणी खड्डे पडलेत. तुम्ही कसले आमच्याकडून टोल वसूल करता? मनमानी सुरू आहे. त्यावर भाजप किंवा सरकार काही बोलणार का? हा प्रश्न तुमचा आहे. या लोकांना तुम्ही विचारलं पाहिजे. पालकमंत्र्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, असंही ते म्हणाले.आम्ही 65 टोल नाके बंद केले. त्याचं कौतुक करणार नाही. जे लोक टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून कॅम्पेन करत होते. त्यांना तुम्ही विचारत नाही, असा प्रश्नच त्यांनी मीडियाला केला.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!