Google Ad
Editor Choice

यांना कोण सांगणार ? महापालिकेच्या सम-विषमच्या आदेशाला फासला हरताळ … पिंपरी चिंचवडमध्ये दुकाने सुरुच

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १६ जून) : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आता कोरोनाची दुसरी लाट सरली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, असे असले तरी काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत म्हणावी तेवढी घट झालेली नाही. आजही पिंपरी चिंचवड शहरात दीडशेहून अधिक रुग्ण दररोज रुग्णालयात दाखल होत आहेत. याच गोष्टीमुळे खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने काही प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहेत. पालिकेने शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्प परिसरात सम आणि विषम तारखेला दुकाने उघडण्याचा आदेश दिलाय.

पण हा आदेश व्यापाऱ्यांनी धुडकवून लावला असून त्यांनी सरसकट दुकाने चालू ठेवली आहेत. याविषयी विचारले असता कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आली. या काळात व्यावसायिक, व्यापारी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता दुकाने बंद केली तर व्यापार बंद पडेल. आर्थिक गणितं बिघडतील, अशी भीती व्यापारी तसेच व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. याच कारणामुळे पिंपरी कॅम्प परिसरात निर्बंध लागू केलेले असूनदेखील व्यापाऱ्यांनी सम विषम तारखेचा विचार न करता दुकाने चालू ठेवली आहेत.

Google Ad

दरम्यान, निर्बंध शिथील केल्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या अनेक भागात लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याचे चित्र दिसते आहे. कोरोना नियमांची पायमल्ली करुन नागरिकांनी अनेक ठिकाणी गर्दी केल्याचेही समोर आले आहे. काळजी घेतली नाही आणि या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या पुन्हा वाढली तर नव्याने निर्बंध लागू करावे लागतील हे नागरिकांना कोण सांगणार?

Google Ad

About the author

Maharashtra14 News

18 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!