Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

आता हा कुटाना कोण, सोडविणार? … ट्रॅफीक पोलिसाने हवालदाराची केली धुलाई … काय आहे, प्रकरण

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रचंड भार हा आरोग्य यंत्रणेवर पडला आहे. तसाच पोलीस प्रशासनावर देखील पडला आहे. यामुळे सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण होऊन अनेक विचित्र प्रकार घडत आहे. येथील पिंपरी चिंचवड येथील भोसरी ठाणे ठिकाणी चक्क एका वाहतूक पोलिसानेच मुख्यालयातील पोलीस हवालदाराला लोखंडी गजाने मारहाण केलीय.

या प्रकरणावरून वाहतूक पोलीस सुरज राजेंद्र पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीनुसार, पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या ५२ वर्षीय पोलीस कर्मचारी किसन गराडे यांनी या प्रकरणावरून भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Google Ad

कोरोनाच्या पार्श्वभूमीत दापोडी हॅरिश पुलाजवळ नाकाबंदी केली गेली होती. त्यावेळी आरोपी सुरज पवार हे त्या ठिकाणी कर्तव्यावर हजर नव्हते. फिर्यादी हवालदार किसन गराडे यांनी त्यांना फोन करून हजर राहण्याबाबत विचारणा केली. यावरून सूरज यांनी तेव्हा ‘तू माझा बाप आहेस का? तू मला कोण सांगणारा?’ असं उद्धट उत्तर त्याने दिले.

आरोपी सूरज याला नाकाबंदी असलेल्या ठिकाणी येण्यास सांगितले. या दरम्यान, यानंतर सुरज पवार याने हातात लोखंडी गज घेऊन आला आणि फिर्यादी किसन गराडे यांच्या पायावर मारून खाली पडून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर सुरज यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!