Google Ad
Editor Choice

आजादी का अम़ुत महोत्सव निमित्त जळगाव येथील ८१ व्या वेळी रक्तदान करणारे कोण आहेत, ‘मदन लाठी’ वाचा सविस्तर …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ ऑगस्ट) : कोणाचा जीव वाचवणे हे रक्तदानाने शक्य होते म्हणून रक्तदान करीत राहावे,

रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ रक्तदान
आयुष्यात येऊन
स्वच्छंदी रक्तदान करावे
रक्तदान करून
लाडके देवाचे व्हावे’

हे ब्रीद येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मदन रामनाथ लाठी यांचे असून या क्षेत्रात ते लोकांना प्रवृत्त करीत असतात. मदन रंगनाथ लाठी हे मूळचे जळगाव तालुक्यातील तापी काठचे वसलेल्या भोकर गावातील एक गरीब शेतकऱ्यांच्या घरी जन्माला आले ते मिळून तीन भाऊ असा परिवार आहे लहानपणी इयत्ता चौथी मध्ये असताना पोटाच्या कॅन्सरने वडिलांना ग्रासले आणि क्रूर काळाने त्यांचे पितृछत्र हरवले या कोवळ्या वयात आभाळमाया कायमची आटली त्यावेळी त्यांच्या परिवारात तीन भाऊ, एक बहिण, आई ,आणि आजोबा असा परिवार होता.

Google Ad

त्याचवेळी खचलेल्या परिवाराला त्यांचे मामा कैलासवासी डॉक्टर किसनलाल भुतडा चोपड्याचे देवासारखे धावून आलेत. या परिवारातील एक सदस्याची शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारले आणि त्यानंतर त्यांनी मदनलाठी यांना चोपडे येते शिक्षणासाठी नेले साधारणता त्यांनी तेथे बारा ते तेरा वर्ष असा कालखंड राहिला, या आयुष्याच्या प्रवासात ते एक पत्रकार म्हणून दैनिक गावकरीचे प्रतिनिधी म्हणून उत्कृष्ट कार्य त्यावेळी केले होते आणि साधारणतः 1981 ते 83 च्या दरम्यान त्यांचा महाविद्यालयाचा कॅम्प एन एस एस 17 सेनेचे बारा दिवसासाठी झाला त्या शेवटच्या दिवशी त्यांनी त्यांचे पहिले रक्तदान सुरुवात केली. अगोदर त्यांना पण घाबरणूक होती परंतु ती घाबरणूक त्यांनी त्याच दिवशी घालवले आणि त्यानंतर त्यांनी संकल्प केला की जसे जसे वेळ मिळेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित रक्तदान करीत राहु
जानेवारी 1983 मध्ये ते भुसावळ पासून दहा किलोमीटर अंतरावर श्री विंध्या पेपर मिल्स या कागद उद्योग समूहात त्यांच्या खऱ्या आयुष्याचे सुरुवात झाली आणि त्यावेळी भुसावळ येथे रक्तपेढी नव्हती जर त्यावेळी रक्तदान कोणास करावयाचे असेल तर जळगाव येथेच जावे लागत होते आणि रक्तदानाचा वेग कमी झाला.

2001 ते 2002 ते जळगाव येथे अदानी उद्योग समूहाच्या जळगाव शाखेत एक वर्ष कार्य केले. त्यानंतर त्यांनी तेरा वर्ष जळगाव आणि नागपूर येथील अंबुजा सिमेंट या शाखेमध्ये कार्य केले, 2001 नंतर त्यांचे नियमित रक्तदानात सुरुवात झाली त्यावेळी त्यांनी जळगाव येथे विविध ब्लड बँकेत शिर्डी येथील साई मंदिरात आणि नागपूर येथे विविध ठिकाणी 2014 पर्यंत रक्तदान केले.


2015 मध्ये जळगाव येथील शेतकऱ्यांसाठी झटणारा कृषी क्षेत्रात अग्रणी असलेला ठिंबक सिंचन पाईपन केळी ग्रीन हाऊस पीव्हीसी शेट अशा नानाविध प्रॉडक्टची निर्मिती करणारा आणि एशिया खंडात सर्वात मोठा जैन उद्योग समूहात ते जानेवारी 2015 मध्ये रुजू झाले त्यानंतर त्यांनी तिथे साधारणता पाच वर्षे कार्य केले त्या कार्यकाळातही त्यांचे नियमित रक्तदान सुरूच होते.

14 जून 2019 रोजी रक्तदाता दिनाच्या दिवशी आपल्या देशाचे तत्कालीन आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी त्यांना मेलद्वारे त्यांचे कौतुक केले आणि त्यांना स्वतः रक्तदान साठी आणि लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करीत चला असा सल्ला देण्यात आला.

त्यामुळे त्यांना त्यावेळी एक वेगळीच प्रेरणा मिळाली
2020 मध्ये ते पुणे येथील न्यू सांगवी मध्ये मुलाकडे आले असताना लॉकडाऊन जाहीर झाले आणि त्या काळात त्यांना तिथेच थांबावे लागले त्या काळातही त्यांनी रक्तदान करीत राहिले आणि सप्टेंबर 20 मध्ये ते लाठी दांपत्य करोना पॉझिटिव्ह झाले आणि त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता या दवाखान्यात भरती करण्यात आले त्याचवेळी त्यांनी संकल्प केला की आपण जर इथून बरे झाले तर लोकांना प्लाजमा देऊन लोकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तसा त्यांनी मेल तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे पाटील आरोग्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास सर यांना केला
यांचा पहिला प्लाजमा 7 नोव्हेंबर 2020 रोजी केला आणि दुसरा प्लाजमा त्यांनी आपल्या देशाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आदरणीय शरद पवार साहेब आणि जळगाव येथील जैन उद्योग समूहाचे संस्थापक कैलासवासी आदरणीय मोठे भाऊ श्री भवरलालजी जैन यांचे पुण्यतिथी त्याच दिवशी असल्याने हा दुसरा प्लाजमाचा संकल्प केला.

त्याचवेळी सोलापूर येथील श्री महेश घाडगे हे आपल्या वडिलांना चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये भरती केले होते आणि प्लाजमाचा शोध घेत होते आणि त्या दिवसाचा योगायोग ने त्यांचा संपर्क श्री मदनलाठीचे झाला आणि त्याचवेळी त्यांनी प्लाजमा त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तो प्लाजमा वायसीएम येते त्यांनी दिला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेस करून ते घाडगे यांना देण्यात आला आणि आज त्यांचे वडील पूर्ववत फिरत आहेत असे हे पुण्याचे काम फार मोलाचे आणि महत्त्वाचे आहे
आणि काही दिवसाने हडपसर येथील श्री रवींद्र पिंगळे हे शिव मध्ये दवाखान्यात भरती असताना त्यांचे शेजारी सौ म्हणले मॅडम यांनी मदनलाठीचे संपर्क केला त्यावेळी सुद्धा मदनलाठी ने त्यांना विलंब न करता दुसऱ्याच दिवशी प्लाजमा आयोजन करून दिला असे दोघेही पेशंट आज पुरवत असून यासारखे पुण्याचे कार्य म्हणजे कुणाला जीवनदान देणे हे फार महत्त्वाचे आहे.

याबरोबर त्यांचे नियमित रक्तदान डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दर तीन महिन्यांनी करीत असतात आज पर्यंत 24 ऑगस्टपर्यंत त्यांचे नियमित रक्तदान 79 अधिक दोन प्लाजमा असे एकूण 81 केले आहे.

आपल्या देशाचे तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय श्री रामनाथ कोविंद सर यांचा ७६ वा वाढदिवस म्हणजे एक ऑक्टोबर
मदन लाठी यांचे ७६ वे रक्तदान तीन ऑक्टोबर रोजी वायसीएम मिळतील शिबिरात अंकुशराव सभागृह भोसरी येथे त्यांनी केले या उपक्रमाबद्दल राष्ट्रपतींचे निधी सचिव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


त्यानंतर त्यांचे ७७ वे रक्तदान
२ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापनेच्या दिवशी वायसीएम मध्ये रविवार रोजी रक्तपेढीत जाऊन केले आणि त्याचवेळी एक सामाजिक बांधिलकी आणि जे पोलीस बांधव आपल्यासाठी जनतेसाठी सेवा करीत आहे त्यांचे फुल नाही फुलाची पाकळी देऊन त्यांनी त्या दिवशी विविध ठिकाणी जाऊन त्यांचे स्वागत केले हा आनंद पोलीस बंधूंच्या गगनात मावत नव्हता हा आगळाच नवीनच होता.

श्री मदन लाठी लग्नाचा वाढदिवस ११ मे २०२१ रोजी या दिवशी त्यांनी एक वेगळाच उपक्रम केला जिजामाता दवाखान्यात जाऊन सर्व त्यांचे अधिकारी जे जनतेसाठी सेवा करीत होते कोविड या परिस्थितीत त्यांचं अंदाजे ६० लोकांचं सकाळी अकरा वाजता जाऊन श्रीफळ गुलाबाचे फुल आणि कॅडबरी असा देऊन सत्कार करण्यात आला

त्यानंतर त्यांचे ७८ वे रक्तदान दिनांक १ मे२०२२ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त न्यू सांगवी येथील निळू फुले सभागृहात माहेश्वरी समाजातर्फे आयोजन केलेल्या शिबिरात केला आणि त्याचवेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला

त्यानंतर ७९ वे रक्तदान आपल्या देशाच्या 75 व्या आजादी महोत्सवानिमित्त दिनांक 15 ऑगस्ट रोजी जुनी सांगली येथील श्री गजानन महाजन मंदिरात वायसीएम रक्तपेढीचे शिबिर होते त्यात त्यांनी रक्तदान केले. असे हे विविध अवचित साधून ते रक्तदान करीत असतात आणि समाजात एक आदर्श करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे इतर लोक रक्तदानास प्रवृत्त होऊन एक देशास मदत मिळते.

मदन लाठी यांना महाराष्ट्र माहेश्वरी युवा संघटना तर्फे करोना योद्धा सन्मानपत्र दिले आहे आणि विविध संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करून योद्धा म्हणून करण्यात आला त्यात जुने सांगव्यातील खानदेश मित्र मंडळ पिंपरी चिंचवड येथील माहेश्वरी समाज सांगवी येथील माहेश्वरी समाज असे विविध ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे राष्ट्रवादीचे पिंपळे गुरव येथील श्री श्याम भाऊ जगताप यांच्या येथे त्यांचा राष्ट्रवादी पक्षातर्फे करोना योद्धा म्हणून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि या त्यांच्या उपक्रमाबद्दल त्यांचे विविध स्तरा तर्फे महाराष्ट्र सचिव विविध यांच्यातर्फे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

व्हाट्सअप द्वारे हा त्यांचा संकल्प डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढे करण्याचा मानस असून आयुष्यात येऊन कोणास जीवनदान देणे हा आहे आणि त्याबरोबर लोकांना रक्तदानास प्रवृत्त करणे हा पण आहे. या रक्तदानाबरोबर त्यांचा एक उपक्रम आहे तो म्हणजे लोकांचा वाढदिवसाला शुभेच्छा देणे हा मोठ्या प्रमाणात आहे आपल्या देशाचे आजी आणि माजी प्रधानमंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, विविध केंद्रीय मंत्री, विविध सचिव, विविध उद्योगपती, खेळाडू, सेलिब्रिटी, अर्थतज्ञ, आणि विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्री ,आणि सचिव, राजकीय नेते, पत्रकार आदींचा समावेश आहे. जेणेकरून ते लोकांना आनंद देत असतात.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!