Google Ad
Uncategorized

मोठी बातमी … महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येणार असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का … यांना आली ईडीची नोटीस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ मे) : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यांना सोमवारी चौकशीला हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. IL&FS प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस धाडल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काही तासातच निकाल देणार आहे. आजच्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं आहे. अशातच जयंत पाटील  यांना ईडीने (ED) नोटीस पाठवल्याने राजकीय वर्तुळात चर्चला उधाण आले आहे. राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. जयंत पाटील यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या  अनेक नेत्यांना धक्का बसला आहे.

Google Ad

जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आला होता. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळेच ईडीने जयंत पाटील यांना नोटीस पाठवली आहे. मात्र, नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र अद्याप अशी कोणती नोटी मिळाली नसल्याचं स्प्ष्ट केलं आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!