Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथील रस्त्याची दुरावस्था दाखवणारा “काय तो चिखल , काय तो रस्ता , काय ते खड्डे , काय लाईट , काय पार्कींग , काय सिमेंट रस्ता, व्वा व्वा सगळं कसं ओके मधी हाय, … फलक सोशल मिडीयावर व्हायरल!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जुलै) : गेल्या आठवडाभरापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्ते जलमय झाले असून नदी नाल्यांना पूर आलाय.

पिंपरी चिंचवड शहरातही मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे शहरातील काही भागातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता हेच कळत नाही. अशातच घरा बाहेर कसं जायचं असा सवाल जुनी सांगवीतील जेष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Google Ad

आमदार शहाजी बापू पाटलांचा एक ऑडियो चांगलाच व्हायरल झाला होता. ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील…एकदम ओक्के!’, हा शहाजी बापू यांचा संवाद इतका लोकप्रिय झाला की यावर सोशल मीडियावर अनेक मिम्सही बनवण्यात आले. इतकंच नाही तर पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथील रस्त्याची अवस्था दाखवणारा

काय तो चिखल , काय तो रस्ता , काय ते खड्डे , काय लाईट , काय पार्कींग , काय सिमेंट रस्ता व्वा व्वा सगळं कसं ओके मधी हाय!

असा जुनी सांगवी येथील पवार नगर येथील रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत लावण्यात आलेला फलक सांगवीकरांचे लक्ष वेधून घेत आहे . तर सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे . जुनी सांगवी पवार नगर येथील रस्त्याचे काम गेली अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. पावसाआधी येथील काम पुर्ण होणे अपेक्षित होते. तसे आदेशही प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!