Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथील रस्त्याची दुरावस्था दाखवणारा “काय तो चिखल , काय तो रस्ता , काय ते खड्डे , काय लाईट , काय पार्कींग , काय सिमेंट रस्ता, व्वा व्वा सगळं कसं ओके मधी हाय, … फलक सोशल मिडीयावर व्हायरल!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जुलै) : गेल्या आठवडाभरापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्ते जलमय झाले असून नदी नाल्यांना पूर आलाय.

पिंपरी चिंचवड शहरातही मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे शहरातील काही भागातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता हेच कळत नाही. अशातच घरा बाहेर कसं जायचं असा सवाल जुनी सांगवीतील जेष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आमदार शहाजी बापू पाटलांचा एक ऑडियो चांगलाच व्हायरल झाला होता. ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील…एकदम ओक्के!’, हा शहाजी बापू यांचा संवाद इतका लोकप्रिय झाला की यावर सोशल मीडियावर अनेक मिम्सही बनवण्यात आले. इतकंच नाही तर पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथील रस्त्याची अवस्था दाखवणारा

काय तो चिखल , काय तो रस्ता , काय ते खड्डे , काय लाईट , काय पार्कींग , काय सिमेंट रस्ता व्वा व्वा सगळं कसं ओके मधी हाय!

पश्चाताप झालेला एक मतदार – असा जुनी सांगवी येथील पवार नगर येथील रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत लावण्यात आलेला फलक सांगवीकरांचे लक्ष वेधून घेत आहे . तर सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे . जुनी सांगवी पवार नगर येथील रस्त्याचे काम गेली अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. पावसाआधी येथील काम पुर्ण होणे अपेक्षित होते. तसे आदेशही प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते.

सांगवी येथील पवार नगर मधील सर्व रहिवाशांना गेली सात महिने हे काम चालू असल्याने त्रास होत आहे. विशेष म्हणजे पावसाळा येण्याची वाटच ठेकेदार पाहत होता की काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. सर्व संबंधीत यांच्यावर कारवाई करावी असा सुर नागरिकांचा आहे. पण पवार नगर मधील सर्व नागरिकांची पाणी, रस्ता, चिखल, लाईट या अडचणीतून बाहेर काढावे हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रशांत शितोळे यांनी कामाची चौकशी व्हावी व या एका रस्त्याच्या कामासाठी ७ महिने का लागले म्हणून आयुक्तांकडे मागणी केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

1 hour ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

8 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

21 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

22 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

1 day ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

1 day ago