Categories: Editor ChoicePune

पुणे तिथं काय उणं … या ५० वर्षीय पुणेकरानं केलंय, चक्क १४ वेळा प्लाझ्मा दान!

महाराष्ट्र 14 न्यूज : रक्तदान म्हंटलं की अनेकांच्या कपाळाला आठ्या पडतात. पण, काही जण पॅशन म्हणून रक्तदान करतात. सामान्य काळात अशी स्थिती असते. कोरोनासारख्या महामारीमध्ये तर प्लाझ्मादान म्हंटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण पुण्याच्या अजय मुनोत यांचं तसं नाही. मुनोत यांनी आतापर्यंत 14 वेळा प्लाझ्मादान केलं आहे. 15 व्या वेळा प्लाझ्मादान करण्यासाठी ते तयार आहेत.

पुणे तिथं काय उणं असं गंमतीनं आणि काहीशा अभिमानानंही म्हणतात…काही तरी अफलातून करावं असा पुणेकरांचा नेहमीच प्रयत्न असतो..बरं हे आत्ताच नाही तर याला चांगलाच इतिहाससुद्धा आहे. या इतिहासाला साजेसा पराक्रम अजय मुनोत या 50 वर्षीय पुणेकरानं केलाय..अजय मुनोत यांना गेल्या जूनमध्ये कोरोना झाला होता आणि 10-12 दिवसांत ते कोरोनातून बरेही झाले.

मुनोत हे व्यवसायानं स्ट्रॅटेजिक कन्सल्टंट आहेत. आपल्या प्लाझ्मादानाची स्टोरीच त्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितली. हे सारं जूनमध्ये सुरु झालं..मला कोरोना झाला आणि उपचाराने मी बराही झालो. बरा झाल्यानंतर सगळीकडं प्लाझ्मा हवा, प्लाझ्मा हवा अशी मागणी होत असल्याचं मी पाहिलं. सोशल मीडियावर असे खूप मेसेज फिरत होते. असंच एक कुटुंब प्लाज्माच्या शोधात होतं. त्यांच्या रुग्णासाठी मी पहिल्यांदा म्हणजे 26 ऑगस्टला प्लाझ्मा दान केलं. त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी दोन वेळा प्लाझ्मा दान केले. डिसेंबर आणि जानेवारीत प्रत्येकी एक वेळा तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये प्रत्येकी तीनवेळा मुनोत यांनी प्लाझ्मा दान केलंय. 7 मे रोजी त्यांनी 14 व्यांदा प्लाझ्मा दिला.

टिंगरेनगरमधले पंकज सोनावणे त्यांची 63 वर्षांची आई जहांगीर हॉस्पिटलमध्ये खूप गंभीर होती. त्यांची फुफ्फुसं खूपच खराब झाली होती. पंकज हे प्लाझ्मादात्याच्या शोधात होते. ऑगस्टमधली ही घटना..पंकज यांनी सर्व रक्तपेढ्यांना भेट दिली, पण कुठेच प्लाझ्मा मिळाला नाही. काही रक्तदात्यांकडे त्यांनी संपर्क साधला, पण त्यांनीही आधी हो म्हंटलं आणि त्यानंतर काही तरी कारण देऊन माघार घेतली. यामध्ये तीन दिवस गेले. अशी शोधाशोध सुरु असतानाच चौथ्या दिवशी पंकज यांना पुणे पोलीस आयुक्तालयामधून अजय मुनोत यांचा नंबर मिळाला. स्वतः मुनोत यांनीच पोलिसांना आपला नंबर देऊन कुणाला प्लाझ्माची गरज असेल तर कॉल करा म्हणून सांगितलं होतं. चौथ्या दिवशी अजय मुनोत यांनी दुसरं प्लाझ्मा दान करुन पंकज सोनावणेंच्या आईचे प्राण वाचवले. अजय मुनोत पुढे आले नसते तर माझी आई वाचू शकली नसती असे सद्गदित करणारे उद्गार पंकज यांनी काढले.

अजय मुनोत यांनी 7 मे 2021 रोजी 14 वं प्लाझ्मा दा न केलंय. प्लाझ्मा दान केल्यानं अशक्तपणा येतो ही रक्तदात्यांमधली भीती दूर करण्यासाठी मी वारंवार प्लाझ्मा दान करत राहिलो असं मुनोत म्हणतात. मी 14 वेळा प्लाझ्मा दान केले, एकाही दिवशी मला अशक्तपणा किंवा अस्वस्थता जाणवली नाही. पण एखाद्याला तो येऊही शकेल असंही मुनोत म्हणाले. प्लाझ्मा घेताना रक्तही घेतात असा एक गैरसमज आहे, त्यात अजिबात तथ्य नाही असं मुनोत यांनी सांगितलं. प्लाझ्मा आणि रक्त वेगळं असतं. प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात. प्लाझ्मा देणं म्हणजे रक्तदान करणं नव्हे अशीही माहिती मुनोत यांनी दिली. मी आधी अँटीबॉडी टेस्ट करुन घेतली, आज 9 महिन्यांनंतरसुद्धा माझ्या रक्तात अँटीबॉडीज आहेत, त्यामुळं 15 व्या वेळीही मी प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार आहे अशी हिंमत मुनोत यांनी दाखवली.

मी माझे सारे प्लाझ्मा पुण्यातल्या कोथरुडमधल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये केलेत असं अजय मुनोत यांनी सांगितलं. सह्याद्री हॉस्पिटलमधल्या डॉ. पूर्णिमा राव यांनीसुद्धा अजय मुनोत यांच्या 14 प्लाझ्मादानाची पुष्टी करुन प्लाझ्मादात्याला कसलाही धोका नाही असं सांगितलं. उलट प्लाझ्मा दानामुळं हाडांचे कार्य वाढते, हाडांमधले स्पंजसारखे टिश्यू नव्या पांढऱ्या, लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट्स तयार करतात असंही डॉ. पूर्णिमा राव म्हणाल्या.

अजय मुनोत यांच्या या प्लाझ्मादानाचा राष्ट्रीय विक्रम बनलाय. सर्वाधिक 14 प्लाझ्मादानाचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदलाय. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनं त्यांच्या या विक्रमावर शिक्कोमोर्तब करुन प्रमाणपत्रही बहाल केलंय. हे प्रमाणपत्र एखाद्या पदकासारखं ते अभिमानानं दाखवत आहेत. समाजात राहून समाजाला काही तरी देणं लागतो, या भावनेनं मुनोत यांनी प्लाझ्मादान केलं, हे खूपच कौतुकास्पद आहे. कोरोनाकाळात जन्माला घातलेली पोरंही दूर जात असल्याच्या कटु बातम्या वाचयला-पाहायला मिळाल्या. मुनोत यांची ही भावना आणि प्रयत्न खूपच दिलासा देणारे आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

1 day ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 days ago