महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०९ मार्च) : राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेचा व्यापारी, उद्योजकांना लाभ होणार आहे.
या योजनेचा कालावधी आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे :-
वस्तू व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राज्य कर विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विविध कायद्यांच्या संदर्भात ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क योजना यांच्या थकबाकीची तडजोड योजना – २०२३’ ही अभय योजना जाहीर करण्यात आली असून या अभय योजनेचा कालावधी दिनांक ०१ मे, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ असेल. दिनांक ०१ मे, २०२३ रोजी प्रलंबित असलेल्या थकबाकीसाठी ही योजना लागू राहील.
वैधानिक आदेशानुसार कोणत्याही वर्षासाठीची, व्यापाऱ्याची थकबाकी रुपये दोन लाखांपर्यंत असल्यास, ही रक्कम त्या वर्षासाठी पूर्णपणे माफ करण्याचे प्रस्तावित आहे. या अभय योजनेचा लाभ लहान व्यापाऱ्यांना अंदाजे एक लाख प्रकरणांत होईल. कोणत्याही वैधानिक आदेशानुसार व्यापाऱ्यांची थकबाकी रुपये ५० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा प्रकरणात एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ८० टक्के रकमेस माफी देण्यात येईल. लहान व मध्यम व्यापाऱ्यांना याचा लाभ अंदाजे ऐंशी हजार प्रकरणांत होईल, असे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…
महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, ७ ऑगस्ट, २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात एक…