Google Ad
Editor Choice

संभाजीनगर च्या सभेत काय झाली ‘राजगर्जना’? … ४ तारखेपासून ऐकणर नाही … भोंगे उतरले नाहीत , तर…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१मे) : रविवार, १ मे अर्थात महाराष्ट्र दिन हा संबंध महाराष्ट्रासाठी सभा दिवस ठरला. एकीकडे मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ‘बूस्टर डोस’ सभा मुंबई येथे पार पडली तर संभाजी नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या दोन्ही सभा चांगल्याच गाजल्या असून दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा लाऊड स्पिकर्सच्या मुद्द्याला हात घालत सरकारवर हल्ला चढवला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी ४ मे चे अल्टिमेटम दिले आहे. जर ४ तारखेच्या आत मशिदींवरचे भोंगे उतरले नाहीत तर सगळीकडे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

Google Ad

काय म्हणाले राज ठाकरे?
मी आत्तापर्यंत मुंबईत आणि ठाणे अशा दोनच सभा घेतल्या. पण या दोन सभांवर किती बोलतायंत? ठाण्याची सभा पाहून संभाजीनगरची सभा ठरली तर पुढच्या सभा मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यात होणार आहेत. विदर्भ, कोंकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे जाणार आहे आणि मी कुठेही बोललो तरी लोकांपर्यंत पोहोचणारच आहे असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

महाराष्ट्राच्या दोन्ही राजधान्या मूळच्या मराठवाडयाच्या. देवगिरीचा किल्ला आणि पैठण. आजच्या महाराष्ट्र दिनी जरा महाराष्ट्र समजून घेणे गरजेचे आहे. कारण जो प्रदेश आपला इतिहास विसरतो त्याच्या पायाखालून भूगोल निसटतो. अल्लाउद्दीन खिलजी या राज्यावर चाल करून आला. रामदेवराव यादव हा आमचा राजा बेसावध राहिला. त्याने एक लाख लोकं घेऊन येतो सांगितलं. प्रत्यक्षात काही हजार लोकं आलेली. किल्ल्यात फितुरी झाली आणि खिल्जी आमची महाराष्ट्राची कन्या पळवून घेऊन गेला. त्यानंतर महाराष्ट्रात अंधःकार होता. अत्याचार होत होते. मग पैठणला संत एकनाथ महाराजांनी आरोळी दिली ‘दार उघड बये दार उघड’ हे दार १६३० साली उघडले. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

१६८० ला महाराज गेले आणि १६८१ ला औरंगजेब इथे आला. इथे आला आणि नंतर परत कधीच गेला नाही. इथेच मेला. त्याच्याशी संभाजी महाराज लढले, राजाराम महाराज लढले, ताराराणी लढल्या. पण त्या औरंगजेबाने आपल्या पत्रात लिहून ठेवलं ‘शिवाजी मला अजून छळतोय’ कारण शिवाजी महाराज हे फक्त एक व्यक्ती नव्हते तो एक विचार होता, प्रेरणा होती ज्याच्या जीवावर हे सगळे लोक लढत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलाय ज्या दिवशी आमच्या लोकांच्या अंगात शिवाजी नावाचे भूत संचारेल तेव्हा आम्ही जग पादाक्रांत करू.

पण आता या राज्याची काय अवस्था करून ठेवल्ये? अब्रू वेशीवर टांगली गेल्ये. शरद पवार म्हणतात ‘हे दोन समाजात दुही माजवतायत’ पण पवार साहेब आपण जाती जातीत भेद निर्माण करताय त्यामुळे दुही माजत्ये. हातात पुस्तक घेतल्यावर आधी लेखकाचे नाव बघितल्यावर आधी त्याची जात बघायची. शरद पवारांच्या आणि राष्ट्रवादीच्या सभा बघा कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याचे दिसणार नाही. मी बोलल्यावर आता नाव घ्यायला लागले. मी शरद पवार हे नास्तिक असल्याचे म्हटल्यावर झोंबलं. पण तुमची कन्या हे लोकसभेत बोलली आहे.

मला सल्ले देतात की आजोबांचे साहित्य वाचा, ते हिंदुत्वाच्या विरोधात होते. पण मी माझ्या आजोबांचे साहित्य वाचले आहे. तुम्ही फक्त तुमच्या सोयीचे वाचलेत. माझे आजोबा हिंदुत्वाच्या विरोधात नव्हते, भटभिक्षुकीच्या विरोधात होते. त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांना उत्तर द्यायला हिंदू मिशनरी चळवळ प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरु केली. सार्वजनिक नवरात्रोत्सव माझ्या आजोबांनी सुरु केला. ‘उठ मराठा जागा हो’ हे पुस्तक माझ्या आजोबांनी हिंदुत्वाबद्दल लिहिलंय.

आपण सगळ्यांकडे जातीने बघायचंय का? शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी कोणी बांधली? ती लोकमान्य टिळकांनी बांधली. लोकमान्य टिळकांनी पहिले वृत्तपत्र काढले त्याचे नाव काय तर ‘मराठा’ मग लोकमान्य टिळकांकडे काय ब्राह्मण म्हणून बघायचं का? जेम्स लेन प्रकरण का काढले? त्यामुळे वृद्धपकाळात बाबासाहेब पुरंदरेंना त्रास दिला. जेम्स लेन याने इंडिया टुडेला मुलाखतीत बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी बोललो नसल्याचे स्पष्ट केले. रामदास स्वामींकडे पण जातीने बघतात.

हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहेच. पण त्या आधी छत्रपती शिवरायांचा आहे. ज्यांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्या महाराष्ट्रात काय एकमेकांकडे जातीच्या चषम्यातून बघायचं का? हे विष आता शाळेत पोहोचत आहे. असा महाराष्ट्र हवाय का आपल्याला?

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!