Google Ad
Editor Choice

Mumbai : Silver Oak वरील हल्ल्यापूर्वी काय घडले, सरकारी वकिलांनी दिली कोर्टात ही माहिती

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ एप्रिल) : शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक घरावर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन प्रकरणात अटकेत असलेले अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली.

त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी कोर्टात युक्तीवाद करताना जी माहिती दिली त्यानुसार हे आंदोलन पूर्वनियोजित होतं आणि त्यासाठी एक बैठक सुद्धा घेण्यात आली होती असा दावा केला आहे. इतकंच नाही तर या हल्ल्याचं नागपूर कनेक्शन असल्याचाही दावा करण्यात आला आहे. काय घडलं कोर्टात? गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ व्हावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

Google Ad

यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद करताना म्हटलं, सिल्वर ओकवर हल्ल्याआधी एक बैठक झाली होती. या बैठकीत सिल्वर ओक येथे हल्ला करण्याचे ठरले होते. अभिषेक पाटील नावाचा एक एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने फोन करुन काही पत्रकारांना बोलावले.

युट्युब चॅनलचे देखील पत्रकार होते. 4 जणांचा ताबा पाहिजे आहे तसंच या प्रकरणी एक जण फरार आहे. वाचा : शरद पवारांच्या Silver Oak घरावरील हल्ला प्रकरणात पोलिसांच्या पत्रातून मोठा गौप्यस्फोट सिल्वर ओकवरील हल्ल्याचं नागपूर कनेक्शन सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी पुढे म्हटलं, MJT मराठी न्यूज चॅनलचा चंद्रकांत सुर्यवंशी नावाचा पत्रकार सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने काही व्हिडीओ डिलीट केलेत.

या पत्रकाराचे आणि सदावर्ते यांचे सकाळी 10.30 पासुन व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग आहेत. या दोघात व्हॉट्सअ‍ॅप कॉल झाले. तर एक फोन नागपूर येथे करण्यात आला त्याचे नाव आता आम्ही कोर्टात सांगू शकत नाही. सरकारी वकिलांनी पुढे म्हटलं, काहीजण या मागे आहेत जे वेस्टेड कारणाकरता सपोर्ट करत आहेत.

यांना गेली 6 महिन्यांपासून पैसे कुठून येतायेत याचा तपास करायचा आहे. 530 रुपये प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा केले गेले जवळपास 1 कोटी 80 लाख रुपये जमा झाले होते. या पैशांचे इतर ही काही लाभार्थी आहेत हे तपासात समोर आले आहे. वाचा : सदावर्तेंच्या आणखी अडचणी वाढल्या, ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलीस कोर्टात हजर सदावर्ते यांचा एक फोन मिसिंग सदावर्ते यांचा एक फोन सापडत नाहीये.

त्यात अनेक महत्वाच्या गोष्टी दडल्या आहेत. मार्च 2022 पासून ते मोबाइल मिसिंग आहे. तो मोबाइल आणि सिम कार्ड जप्त करायचे आहे. सदावर्ते हे नागपूरमध्ये कोणच्या तरी सतत संपर्कात होते. घटनेच्या दिवशी सकाळी 11.35 मिनिटांनी फोन केला गेला होता. दुपारी 1.38 वाजता नागपूरच्या नंबरवर मॅसेज करुन सांगितले गेले की पत्रकार पाठवा. 2.45 वाजता इलेक्ट्रॉनिक्स पत्रकारांना कळवण्यात आलं असंही सरकारी वकिलांनी म्हटलं आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!