Google Ad
Editor Choice Education

कोणत्या क्षेत्रात करियर करायचं ? १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी १२ जून रोजी करिअर मार्गदर्शन सेमिनार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११जून) : कोणत्या क्षेत्रात करियर करायचं ? याबद्दल मुलांच्या मनात प्रचंड गोंधळ असतो आणि त्यातल्या त्यात गरीब वस्त्यांमधील मुलांना तर मार्गदर्शन करायला कुणीच नसतं, अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना करियर निवडीबद्दल योग्य ते मार्गदर्शन मिळावे आणि त्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल सुकर व्हावी यासाठी आमदार लक्ष्मण जगताप व शंकरशेठ जगताप मित्र परिवाराच्या वतीने १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत ‘करिअर मार्गदर्शन’ शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

१० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे शिबीर असून हा कार्यक्रम रविवार दिनांक १२ जून २०२२ रोजी सायं ०५ ते ०७ वा. दरम्यान नटसम्राट निळु फुले नाट्यगृह , नवी सांगवी , पुणे येथे होणार आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला या विषयामध्ये विशेष अनुभव असलेले मार्गदर्शक मा . विजय नवले ( बी.ई.एम. ई . एम . बी.ए. ) व श्री केतन देशपांडे ( Founder & CEO Fusi ) तसेच उमेश बोरसे, द्रोणाचार्य क्लासेस हे करणार आहेत.

Google Ad

▶️विषय :
●१० वी आणि १२ वीत शिकत असलेल्या व नुकतीच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी करियर वाटा
●कौशल्य , तंत्रज्ञान शिक्षण आणि भविष्यातील करियरच्या संधी
●करियर निवडीत पालकांची भूमिका

▶️स्थळः
नटसम्राट निळु फुले नाट्यगृह , नवी सांगवी , पुणे
वेळ :
सायंकाळी -०५ ते ०७ वा.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!