किशोर कदम यांनी लिहिलं आहे,”मुंबईहून पुण्याला जाताना एक्सप्रेस हायवेवर 240 रुपये टोल घेतात..मध्ये मन:शांती वगैरेमध्ये काही खायला लोणावळ्यात उतरलं की वर हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा 240 का घेतात? टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्याबद्दल कुणी बोललं का”.
सौमित्र यांनी पुढे लिहिलं आहे,”एरवीही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तासा दोनतासांनी येत राहतात. ते पैसे कुठे आणि का जातात? अरे लूट थांबवा रे ही…लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात? कुणाकडे तक्रार करायची? याला जबाबदार अधिकारी कोण आहेत?”.
किशोक कदम यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. “मोठ मोठे खड्डे आहेत तरी टोल आकारला जातो..नुसता काळाबाजार, सरकार लुटत असते..जनता निमूटपणे लुटत असते, सदासर्वदा हीच परिस्थिती आहे, जुना हायवे वापरा सरळ, सरकार वेगवान आहे, भयंकर लूटमार सुरू आहे, लोकांनाअजूनही बोलता येत नाही हीच मोठी शोकांतिका आहे अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
किशोर कदम यांच्याआधी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऋजुता देशमुखनेदेखील मुंबई-पुणे एक्सप्रेस वेसंदर्भातील पोस्ट शेअर केली होती. तसेच ‘खरचं असा नियम आहे? आणि असला तर तो बरोबर आहे का?’ असा प्रश्न तिने नितीन गडकरी यांना विचारला होता. तसेच ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेते मिलिंद दास्तानेही त्यांना आलेला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला होता.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…