Categories: Editor Choice

कॉलेज, हॉटेल ते नाट्यगृह, पुण्यासाठी नवे नियम काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ ऑक्टोबर) : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कोरोना आढावा बैठक घेऊन, नवे नियम जाहीर केले. अजित पवारांनी पुणे जिल्ह्यासाठी नवी गाईडलाईन जारी केली. यानुसार आता सोमवारपासून खासगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहोत, मात्र नियमाचे पालन करावं लागेल. 22 ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी सांगितलं. इतकंच नाही तर पुण्यातील हॉटेल आता 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अजित पवार म्हणाले, दर आठवड्याच्या प्रथेप्रमाणे आज बैठक पार पडली. सोमवारपासून खाजगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहोत. मात्र नियमांचे पालन करावं लागेल. नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी असेल. हॉटेल रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल.

सोमवारपासून कॉलेज सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन्ही डोस घेणं बंधनकारक असेल. ज्यांनी दोन डोस घेतले त्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे. असं अजित पवार म्हणाले.

झोपडपट्टी परिसरात लसीकरण कमी होत आहे. पुण्याचा कोरोना दर 2.5 दर आहे. बाधित दर 3 टक्के आला आहे. पहिला डोस घेण्याऱ्यांचे प्रमाण 103 टक्के आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

15 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

22 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago