FRIENDSHIP WITH CROP पोलिस आणि विद्यार्थी यांच्या मैत्रीचा धागा घट्ट विणत … बा. रा.घोलप महाविद्यालयात रंगला अनोखा ‘फ्रेंडशिप डे’

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ ऑगस्ट) : मैत्री हे एक सुंदर नातं आहे , जे तुम्हाला जन्मापासून मिळत नाही , ते आपण स्वतःसाठी निवडतो . प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीचं नातं खूप खास असतं . खरा मित्र आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा असतो . तुम्ही तुमची स्वप्ने आणि गुपिते खऱ्या मित्रासोबत शेअर करू शकता , ज्याबद्दल तुमच्या जवळच्या लोकांनाही माहिती नसते . ही मैत्री साजरी करण्यासाठी दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो .

परंतु आजचा ‘फ्रेंडशिप डे’ काहीसा आगळा वेगळा होता, निमित्त होते, सांगवी पोलिस स्टेशनचे पोलिस आणि बाबुराव घोलप महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी आयोजित केलेल्या ‘फ्रेंडशिप डे’ चे … या कार्यक्रमाची संकल्पना नानासाहेब वरुडे (पोलीस उपनिरीक्षक सांगवी पोलीस स्टेशन), यांना सुचली आणि त्यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांविषयी असणारी नाहक भीती या विषयावर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ च्या बाबुरावजी घोलप माध्य . व उच्च माध्य . विद्यालय आणि सांगवी पोलीस स्टेशन आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व FRIENDSHIP WITH COPS कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुनील टोनपे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी पोलीस ठाणे , कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन घोरपडे प्राचार्य, बी . जी . मापारी प्राचार्य, व्ही . आर . निमसे उपप्राचार्य, श्रीम . आवारी एस.बी (उपमुखायधपीका), सुनील तांबे पोलिस निरीक्षक ( गुन्हे ) सांगवी पोलीस ठाणे, कार्यक्रमाची संकल्पना व रूपरेषा नानासाहेब वरुडे पी.एस.आय सांगवी पोलीस स्टेशन व सर्व सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस तसेच सौ चासकर मॅडम, सौ खळदकर मॅडम आणि महाविद्यालयातील शिक्षक वर्ग व पाचवी ते बारावी चे विद्यार्थी उपस्थित होते.

ज्या दिवशी आपल्यातील प्रत्येकजण स्वतः ला पोलिस समजेल त्या दिवशी राष्ट्रीय क्रांती येईल .” जे प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतात, काही ठिकाणी त्यांना वर्दी मजबूर करत असते , आणि जे प्रामाणिक असतात त्यांना वर्दी मजबूत बनवत असते . ” मित्रहो २४ तास जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेले पोलिस न्यायाचे रक्षक आणि अन्यायाचे भक्षक असतात . सभोवताली पोलिस दिसला की कसे सुरक्षित वाटू लागते . एक पोलिस अधिकाऱ्याचे जीवन अनेक संकटे आणि शौर्याने भरलेले असते . परंतु संकटे आणि जोखीमिला न घाबरता ते प्रत्येक परिस्थितीला भिडण्यासाठी तयार असतात . देव वेगवेगळ्या रुपात असतो माझा देव मला खाकीत दिसतो खाकीतल्या देवाला आणि आपली सुरक्षा ज्यांच्या खांद्यावर असते, मिरवणुकीत सदा रस्त्यावर उभा असतो देशाच्या सुरक्षारक्षकास आपला मित्र समजून मैत्री चा धागा बांधण्यात आला.यावेळी अनेकांनी आपले अनुभव कथन केले, त्यावेळी ज्यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली ते नानासाहेब वरुडे (पोलीस उपनिरीक्षक सांगवी पोलीस स्टेशन), म्हणाले की, सोशल मीडियावर जागृत व्हायला शिका, आपली दैनंदिन जीवन जगताना आपली मेहनत आणि विचार आपल्या ला आयुष्याच्या उंचीवर घेऊन जातात. आपल्या अंतरंगात ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातात, त्यामुळे बाह्यरंगावर जाऊ नका, आपली संगत चांगली असावी. तुमचे भविष्य तूमच्या हातात आहे.

सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील टोनपे, म्हणाले, आमच्या लहानपणी आणि आता तुम्हालाही “रडू नको नाहीतर, पोलिस मामांना देईल”… असे आई वडील म्हणायचे, का तर पोलिसांबद्द्ल भीती असते. परंतु ती भीती मैत्रीतही बदलता येते, विद्यार्थी आणि पोलीस यांनी मैत्रीचे नाते जोपासावे, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत अभ्यास करावा, विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा विचार करून आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटले पाहिजे, देशाचा अमृतमहोत्सव सजरा करण्याकरीता सर्व विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्ट रोजी आपापल्या घरावर देशप्रेमा करीता तिरंगा लावावा.

पोलिस निरीक्षक टोनपे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना अचानक पाऊस सुरू झाला, तरीही विद्यार्थ्यांनी ‘सर भाषण करा, असे टोनपे यांना म्हटल्यावर ते म्हणाले, “पावसात भाषण केल्यावर माणूस निवडून येतो”… त्यावर विद्यार्थ्यांमध्ये एकच हशा पिकला.

तर सांगवी वाहतूक विभागाचे संतोष माळी यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – संजय मेमाणे सर यांनी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

12 hours ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

1 day ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

1 day ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

5 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

7 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

1 week ago