Google Ad
Agriculture News Editor Choice

महाराष्ट्रात आजही पावसाची दमदार बॅटिंग ? हवामान विभागानं काय सांगितला अंदाज?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७जून) : मान्सूनचा पाऊस शनिवारी महाराष्ट्रात दाखल झाला असून त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आजही पाऊस हजेरी लावणार आहे. महाराष्ट्रातील उत्तर कोकण किनारपट्टीच्या भागात आज पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण किनारपट्टी भागातील रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पाऊस होऊ शकतो. हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी ट्विटकरुन ही माहिती दिली आहे.

भारतीय हवामान विभागानं 4 जून रोजी वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात दिवस राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी गडगडासहित पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये आजही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Google Ad

मान्सून पाऊस शनिवारी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून राज्यभरात वेगाने आगेकूच करत आहे. कोकण परिसरात मान्सून अलिबागपर्यंत पोहोचला आहे. पुण्यातही रविवारी मान्सूनचे आगमन झाले होते. मान्सूनचा सध्याचा वेग पाहता तो अपेक्षेपेक्षा लवकर राज्य व्यापेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी हे शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावले आहेत. मान्सून राज्यात दाखल झाल्याने आता शेतीच्या कामांना वेग आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाजानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 101 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं

Google Ad

About the author

Maharashtra14 News

19 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!