Google Ad
Editor Choice Health & Fitness Pimpri Chinchwad

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांचा सांगवीकरांकरीता ‘आम्ही जबाबदारी घेतो, तुम्ही खबरदारी घ्या’ उपक्रम … विकलांग, अपंग, दिव्यागांना दिला आधार!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०६ एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या संसर्गाचा कहर वाढतच चालला आहे. अशा परिस्थितीत प्रत्यकाने शासनाच्या नियमाप्रमाणे लसीकरण करून घेणे गरजचे आहे. पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि जेष्ठ नागरिकांची संख्या व त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, लसीकरण केंद्रापर्यंत जेष्ठ नागरिक पोहचले पाहिजेत ही बाब राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या लक्षात आली, आणि त्यांनी याकरिता आपल्या भागात वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली. आपल्या सिझन ग्रुप सोशल वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक, समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत, कोरोनाच्या काळात अनेक गरजूंना मदत केली आहे,अन आजही करत आहेत.

जुनी सांगवी परिसरात तीन ठिकाणी कोविड लसिकरण सुरू असून १ एप्रिल पासून वय वर्षे ४५ पुढील सर्वांना या केंद्रातून लसीकरण करण्यात येत आहे. जुनी सांगवी येथे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पालिका शाळा, सांगवी रुग्णालय, कै.शकुंतलाबाई शितोळे शाळा या तीन ठिकाणी लसीकरण सुरू आहे. याचबरोबर दापोडी, पिंपळे गुरव शाळा येथे लसीकरण केंद्र सुरू आहेत. तर सामाजिक राजकीय मंडळींनीही जनजागृती करून पुढाकार घेतल्याने लसीकरण करुन घेण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत.

Google Ad

🔴सोशल मीडियावर चुकीची माहिती

काही महिन्यांपूर्वी सोशल मिडिया वरील चुकीच्या माहितीमुळे काही नागरिक लसीबाबत विनाकारण भिती बाळगत होते. यामुळे लसिकरण काही ठिकाणी संथ गतीने सुरू होते. मात्र सामाजिक राजकीय मंडळींकडूनही जनजागृती होत असल्याने परिसरात लसीकरणासाठी नागरीक पुढे येत आहेत. लसीकरण ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येत असल्याने नागरिकांनी थेट लसीकरण केंद्रावर आधारकार्ड घेवून जाऊन न घाबरता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सांगवी रुग्णालयाच्या जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.विजया आंबेडकर यांनी केले आहे.

🔴जेष्ठांचा लसीकरणास वाढता प्रतिसाद

आम्ही जबाबदारी घेतो तुम्ही खबरदारी घ्या या उपक्रमांतर्गत विकलांग,अपंग,दिव्यांगाना आमच्याकडून लसिकरण केंद्र ते घर अशी ये जा करण्यासाठी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी सुविधा उपलब्ध केल्याने लसीकरणाला जेष्ठ नागरिकांचा प्रतिसाद वाढतो आहे. तसेच लस घेतल्यानंतरही नागरिकांनी आपली व इतरांची काळजी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, जास्तीतजास्त वेळा हात धुवावेत, व प्रत्येकाने मास्कचा वापर करावा असे आवाहन ‘प्रशांत शितोळे’ यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1,043 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!