Google Ad
Editor Choice

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वेस्ट टु एनर्जी प्रकल्प महत्वाचा ठरणार – महापौर उषा उर्फ माई ढोरे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १२ ऑगस्ट) : वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, बांधकाम राडारोडा व्यवस्थापनामुळे पर्यावरणाचा ऱ्हास व शहरातील बांधकाम राडारोडा कमी होण्यास मदत होणार असून ते शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी हे दोन्ही प्रकल्प महत्वाचे ठरणार आहेत, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांनी दिली. आज महापौर यांनी पदाधिकारी व अधिकारी यांच्यासमवेत मोशी कचरा डेपो येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प व बांधकाम राडारोडा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी, उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्यासह शाखा अभियंता श्री.एस.बी.शितोळे तसेच या प्रकल्पाचे मे. टंडन अर्बन सोल्युशन प्रा.लि कंन्सल्टंटचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सदर दौ-यामध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाबरोबरच मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (MRF), मेकॅनिकल कंपोस्ट प्लॅन्ट च्या प्रकल्पाचीही पाहणी करण्यात आली. वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पात मनपा हद्दीतील कचरा जागेवरुनच सुका व ओल्या कच-याचे वर्गीकरण होऊन आल्यास मोशी कचरा डेपो येथील ताण कमी होणार असल्याचे निदर्शनास आले. येत्या सप्टेंबर महिन्यात प्रकल्पाचे काम पुर्ण होवून ते पुर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असुन या प्रकल्पामध्ये १००० टी.पी.डी क्षमतेच्या मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी उभारणे व ७०० टी.पी.डी. क्षमतेचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प DBOT तत्वावर उभारणेचा कामाचा समावेश आहे.

Google Ad

हा प्रकल्प कार्यान्वित झालेनंतर १४ मेगावॅट प्रति तास वीजनिर्मिती होवुन मनपाच्या विद्युत खर्चात ३०  ते ३५ टक्के बचत होणार आहे. तसेच भविष्यात वाढणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी बांधकाम राडारोडा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पामध्ये शहरात निर्माण होणाऱ्या बांधकाम प्रकल्पामधून निर्माण होणाऱ्या राडारोडयावर प्रक्रीया करणेत येणार आहे.  यावर प्रक्रिया केलेनंतर त्यापासून GSB, Wet Mix,  पेव्हींग ब्लॉक, डिव्हायडर, चेंबर कव्हर इत्यादी तयार करण्यात येणार आहे. हे काम सप्टेंबर अखेरपर्यंत पुर्ण क्षमतेने सुरु करण्याच्या यावेळी सुचना दिल्या.

सद्यस्थितीत सदर प्रकल्प उभारणीचे काम प्रगती पथावर असुन मार्च २०२० पासून बांधकाम राडारोडा गोळा करण्याची प्रक्रियाही चालू करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे बायोमायनिंग प्रकल्पाची माहिती घेतली असता हा या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जागा तातडीने उपलब्ध करुन घेवुन हे एक आकर्षक पर्यटनस्थळ निर्माण होईल असे नियोजन करुन या ठिकाणी सुशोभिकरणाच्या दृष्टीने वेगवेगळी झाडे लावुन वृक्षारोपण करण्यात यावे अशा सुचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिल्या

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!