Google Ad
Editor Choice

नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा … पवना धरणातून दुपारी २.०० वाजता ५५५० क्युसेक्सने पाणी सोडणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ सप्टेंबर) : पवना धरण क्षेत्रात वरुण राजाने कृपा केल्याने पवना धरणात १०० % पाणी साठा झालेला असुन हवामान अंदाजानुसार धरणाच्या पाणलाेट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेले अाहे व त्यामुळे धरणाच्या पातळीमध्ये वाढ हाेत आहे. धरणा मध्ये हाेणारी पाण्याची आवक पाहता धरणाच्या सांडव्यावरुन आज दुपारी २.०० वाजता पाण्याचा विसर्ग साेडण्यात येणार आहे .

तरी पवना धरणाच्या खालील बाजुसनदी तीरा कडील सर्व गावातील नागरीकानी दक्ष राहुन नदी तीरावरील
त्यांचे सर्व जनावरे, माेटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित हलविण्यात यावे .जेणे करून कुठलीही जिवित व वित्त हीनी हाेणार नाही याची काळजी घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे असे कळविण्यात आले आहे.

Google Ad

पवना धरण १३५० क्युसेक विसर्ग वीज र्निमिती संचा द्वारे साेडण्यात आलेला असुन आज दुपारी २.०० वा. सांडव्या द्वारे २१०० क्युसेक विसर्ग वाढवुन ४२०० क्युसेक करण्यात येणार आहे. एकुण ५५५० क्युसेक विसर्ग साेडण्यात येणार आहे.
तरी पवना नदी तिरावरील सर्व गावातील नागरिकानी सर्तक रहावे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!