महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात तयार झालेल्या अॅन्टीबॉडिजमुळे अशा रुग्णांच्या ‘प्लाझ्मा’चा (रक्तातील एक महत्त्वाचा घटक) कोरोना उपचार घेत असलेल्या रुग्णांना फायदा होतो व कोरोनावर मात करण्यात त्यांना यश येते. अशा रुग्णांनी प्लाझ्मा दान करावे व आपल्या बंधू भगिनींचे प्राण वाचवण्यासाठी मदत करावी असे आवाहन पिंपरीचिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील कोरोना मुक्त झालेल्या नागरिकांना केले होते.
त्यास प्रतिसाद देत पी डी फाउंडेशन व वाकड पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड आयुक्तलय यांच्या संयुक्तविद्यामाने ०८ ऑगस्ट रोजी वाकड पोलीस चौकी येथे रक्तदान व प्लाझ्मादान शिबिर आयोजित केले होते. या मधे १० रुग्णांनी प्लाझ्मादान व १०८ जणानी रक्तदान केले. या शिबिरासाठी पोलिस अधिकारी व सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले, या शिबिरामध्ये वाय सी एम हॉस्पिटल ब्लड बँक यांना पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सहा.पोलीस आयुक्त श्रीधर जाधव,वरिष्ट पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मूगळीकर, सहा पोलीस निरिक्षक महेश स्वामी हे उपस्थित होते.

तसेच रामदास लाड,ऊमेश पाटमास,गोपाळ बंदी ,दत्ता सुतार अमर माळी ,ऊत्तम चकवे, पांडूरंग पाटील वाय सी एम हॉस्पिटल डॉक्टर व इतर सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी पी डी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष औदुंबर कळसाईत यांनी सर्वांचे आभार मानले.
38 Comments