पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातील ओबीसी तसेच बारा बलुतेदार यांच्याशी घट्ट नाळ असलेले नेहमी जन माणसात वावरणारे म्हणून विशाल जाधव यांची शहराला ओळख आहे,प्रत्येक सामाजिक राजकीय कार्यात हिरीरीने पुढाकार घेऊन स्वतःला समाजकार्यात झोकून देणे व ते काम तडीस नेणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे.
ओबीसी समाजाचे असंख्य पाठबळ असल्याने प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी विशाल जाधव यांना पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे अशा भावना ओबीसी समाज बांधवांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
विशाल जाधव यांचे ठिकठिकाणी सत्कार आयोजित केली जात असून जनसामान्यांमधून त्यांना प्रचंड असा प्रतिसाद भेटत आहे. विशाल जाधव यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले, दिलेल्या संधीचे सोने करणार तळागाळातील प्रत्येक उपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचून प्रशासनातील समाजातील चुकीच्या गोष्टींबद्दल आवाज उठवत राहणार, प्रत्येक क्षण समाजासाठी अर्पण करणार पिंपरी चिंचवड शहर ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते येथील कामगारांचे प्रश्न, व्यापारी वर्गाचे प्रश्न, शोषित पीडितांच्या समस्या, वाढती गुन्हेगारी, रस्त्यांच्या, ट्राफिकच्या समस्या, युवकांच्या बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशा भावना व्यक्त केल्या.
अॅड वंदनाताई चव्हाण, सुप्रियाताई सुळे यांनी देखील विशाल जाधव यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात विशाल जाधव यांच्याकडून खूप सार्या अपेक्षा असल्याचे सांगितले तसेच विशाल जाधव या सर्व अपक्ष पूर्ण करतील आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारतील अशी आम्हाला खात्री आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच विशाल जाधव यांच्या पाठीशी भक्कपणे उभा राहील असेही मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…