Google Ad
Uncategorized

मणिपूरमधील हिंसाचार चिघळला; दंगलखोरांनी चक्क शाळाच पेटवली

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ ,जुलै) :चूडाचांदपूर आणि विष्णूपूर जिल्ह्याच्या सीमेवरील एका शाळेला दंगलखोरांनी आग लावली.

मणिपूरमधील परिस्थिती अधिक चिघळली आहे. गोळीबारादरम्यान एका शाळेला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

Google Ad

विष्णूपूर आणि चूडाचांदपूर येथील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. त्यातच राज्यातील दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याने वातावरण अधिकच तापले आहे.
चूडाचांदपूर आणि विष्णूपूर जिल्ह्याच्या सीमेवरील एका शाळेला दंगलखोरांनी आग लावली. त्यातच क्वात्ता भागातील हिंसेदरम्यान एका महिलेला गोळी लागली. तिला तत्काळ इम्फाळमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. गेल्या काही दिवसांत पुन्हा भडकलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर रविवारीही अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या.

परिसरात सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आले आहे. तर, शाळेला आग लागल्याने सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे शाळेच्या प्रशासकांतर्फे सांगण्यात आले. यात पुस्तके, फर्निचर आणि भांड्यांचे नुकसान झाले. ३ मेपासून सुरू झालेल्या हिंसाचारापासून मणिपूरमधील ही शाळा रिकामी होती. तर, सरकारने याआधीच शाळा पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

या शाळेचे नाव चिल्ड्रन्स ट्रेजर हायस्कूल असे आहे. ‘सुदैवाने शाळेच्या पहिल्या मजल्यावर कोणीही नव्हते. भवनाच्या आजूबाजूच्या अनेक घरांना आगी लावण्यात आल्या होत्या, त्यामुळे आम्ही सतर्क होतो. शाळेचा चौकीदार याआधीच त्याच्या कुटुंबीयासोबत पळून गेला आहे,’ अशी माहिती या शाळेचे प्रमुख लियान खो थाग वेइफी यांनी दिली. या घटनेमुळे राज्यातील अन्य शाळांमध्येही भीतीचे वातावरण आहे. असेच होत राहिल्यास येथील मुलांच्या शिक्षणावर बिकट परिणाम होण्याची भीती आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!