महाराष्ट्र14 न्यूज, (दि.२८ जानेवारी) : श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान खेड-लोटे गोशाळेच्यावतीने ज्येष्ठ गोभक्त, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त २६ ते २८ जानेवारी दरम्यान गोशाळेत राष्ट्रीय गोसंमेलनाचे लोटे येथे आयोजन करण्यात आले होते.
कोकणच्या उत्पन्नात वाढ व्हावी, इथल्या तरुणांना रोजगार मिळावा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ व्हावी यासाठी रत्नागिरीमध्ये रिफायनरी प्रकल्प येणारच, विरोधकांनी विरोधाची चिवचिव बंद करावी असं स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं उत्पन्नात वाढ व्हावी, इथल्या तरुणांना रोजगार मिळावा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ व्हावी यासाठी रत्नागिरीमध्ये रिफायनरी प्रकल्प येणारच, विरोधकांनी विरोधाची चिवचिव बंद करावी असं स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं.
नारायण राणे यावेळी बोलताना म्हणाले, की ज्याने रिफायनरी होऊ देणार नाही असं म्हणणाऱ्यांची ताकद हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनीही आता विरोध करणं बंद करावं, इथल्या प्रत्येक हाताला रोजगार हवा आहे, लोकहितासाठी, इथली बेरोजगारी दूर करण्यासाठी, या प्रकल्पाची नितांत गरज आहे. शिकलेल्या मुलांना नोकऱ्या मिळतील, छोटे-मोठे प्रकल्प व्यवसाय त्याच्यात मुलं नोकरीला लागतील, या परिसराचा विकास होईल त्यामुळे विरोधाची चिवचिव करणाऱ्यांनी ती बंद करावी असा सज्जड इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
ह. भ. प. भगवान कोकरे महाराज यांच्या गोशाळे बाबतचा प्रश्न आपण स्वतः लक्ष घालून सोडवणार आहोत. गोशाळा ही शेती विषयी संबंधित आहे. त्याला एमआयडीसी व्यावसायिक निकष लागू होणार नाहीत. गो शाळेमुळे पर्यावरणाशी कोणतीही हानी होणार नाही असं असताना कायद्याचा अभ्यास न करता विरोध करणं आणि विरोधाला विरोध करणं हे केवळ चुकीचा आहे. या गोशाळेच्या जागेचा प्रश्न आम्ही लक्ष घालून सोडवणार असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही सुद्धा राणे यांनी या वेळेला दिली.
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ ऑगस्ट २०२५ :* कधी कुणी नात्यांपासून दूर गेलेलं, तर कुणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.02ऑगस्ट) : अनेक लोक त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 ऑगस्ट :– पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल ५० शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक…
महाराष्ट्र 14 न्यूज,पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :- जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन…
महाराष्ट्र 14 न्युज, दि.02ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, व्यायाम…