Google Ad
Uncategorized

राष्ट्रीय गो संमेलनाच्या निमित्ताने खेड येथे गोसेवक विजयशेठ जगताप यांचा केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.२८ जानेवारी) : श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान खेड-लोटे गोशाळेच्यावतीने ज्येष्ठ गोभक्त, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त २६ ते २८ जानेवारी दरम्यान गोशाळेत राष्ट्रीय गोसंमेलनाचे लोटे येथे आयोजन करण्यात आले होते.

कोकणच्या उत्पन्नात वाढ व्हावी, इथल्या तरुणांना रोजगार मिळावा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ व्हावी यासाठी रत्नागिरीमध्ये रिफायनरी प्रकल्प येणारच, विरोधकांनी विरोधाची चिवचिव बंद करावी असं स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं उत्पन्नात वाढ व्हावी, इथल्या तरुणांना रोजगार मिळावा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ व्हावी यासाठी रत्नागिरीमध्ये रिफायनरी प्रकल्प येणारच, विरोधकांनी विरोधाची चिवचिव बंद करावी असं स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं.  राष्ट्रीय गो संमेलनाच्या निमित्ताने खेड येथे आले असता त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. यावेळी करोन महामारीच्या काळात लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांनी या गाईना चारा उपलब्ध करून त्यांना वाचवले होते, आणि आजही त्यांच्या परिवाराकडून हे सेवाकार्य अखंडपणे सुरू आहे, या सेवकार्याची दखल घेऊन राष्ट्रीय गो संमेलनाच्या निमित्ताने खेड येथे गोसेवक विजयशेठ जगताप यांना केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या ठिकाणी भगवान कोकरे महाराज यांनी १०६० गाईंचे संगोपन केले आहे. यावेळी बोलताना कोकरे महाराज म्हणाले, या गोशाळेसाठी लोकनेते लक्ष्मण जगताप यांचे बंधू विजूशेठ जगताप यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभले , आता या गोशाळेला आम्ही लोकनेते लक्ष्मण जगताप यांचे नाव देणार आहे.

Google Ad

नारायण राणे यावेळी बोलताना म्हणाले, की ज्याने रिफायनरी होऊ देणार नाही असं म्हणणाऱ्यांची ताकद हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनीही आता विरोध करणं बंद करावं, इथल्या प्रत्येक हाताला रोजगार हवा आहे, लोकहितासाठी, इथली बेरोजगारी दूर करण्यासाठी, या प्रकल्पाची नितांत गरज आहे. शिकलेल्या मुलांना नोकऱ्या मिळतील, छोटे-मोठे प्रकल्प व्यवसाय त्याच्यात मुलं नोकरीला लागतील, या परिसराचा विकास होईल त्यामुळे विरोधाची चिवचिव करणाऱ्यांनी ती बंद करावी असा सज्जड इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

ह. भ. प. भगवान कोकरे महाराज यांच्या गोशाळे बाबतचा प्रश्न आपण स्वतः लक्ष घालून सोडवणार आहोत. गोशाळा ही शेती विषयी संबंधित आहे. त्याला एमआयडीसी व्यावसायिक निकष लागू होणार नाहीत. गो शाळेमुळे पर्यावरणाशी कोणतीही हानी होणार नाही असं असताना कायद्याचा अभ्यास न करता विरोध करणं आणि विरोधाला विरोध करणं हे केवळ चुकीचा आहे. या गोशाळेच्या जागेचा प्रश्न आम्ही लक्ष घालून सोडवणार असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही सुद्धा राणे यांनी या वेळेला दिली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!