महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ डिसेंबर) : वैविध्यपूर्ण अनुभवांची श्रीमंती आणि सळसळता उत्साह यांच्या संमिलनाने आजचा कट्टा गाजला.. उपस्थित मान्यवरांनी आपल्या अनुभवाची शिदोरी खुली केली आणि सगळ्यांनाच एक आनंददायी अनुभव दिला.
आजचे मानकरी होते… मा. विकास (नाना) दांगट, मा. संतोषजी नांगरे, बांधकाम व्यावसायिक विवेकजी देशपांडे, महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देणारी आर्या भागवत. या सर्वांचे औक्षण करून शंखनादाने स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांना शिंदेशाही पगडी, मानाची शाल, मोत्याची माळ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना विकास (नाना) दांगट यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पुणे जिल्हा बँक यांच्याशी संबंधित विविध अनुभव सांगितले. या दोन्ही संस्थांचे शेतकऱ्यांच्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे याविषयी त्यांनी विवेचन केले.
संतोष नांगरे यांनी माथाडी, अडते, मार्केट कमिटी यांचे साखळी समाजासाठी किती उपयुक्त आहे याची सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे या क्षेत्रामध्ये विविध राजकीय घडामोडी विषयीही त्यांनी भाष्य केले.विवेकजी देशपांडे यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गोरगरिबांना स्वस्तात घरे बांधून देण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहे त्याची माहिती दिली. अपंग, मतिमंद, एचआयव्हीग्रस्त अशा मुलांसाठी ते जे काम करीत आहेत त्याचीही उल्लेखनीय माहिती यावेळी मिळाली.
राजकीय वारसा असताना देखील क्रीडा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देणारी आर्या भागवत तिनेही आपल्या खेळाचा प्रवास उलगडला. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्वल करण्याचा मनोदय व्यक्त केला . एकूण आता रंगतदार वातावरणामध्ये आजचाही ऐश्वर्य कट्टा रंगला.
यावेळी अप्पा रेणूसे यांच्यासह विलासराव भणगे, रविंद्र संचेती, नेमीचंद सोळंकी, अॅड. दिलीप जगताप, सचिन डिंबळे, शंकरराव कडू, सर्जेराव शिळीमकर, आकाश वाडघरे, मधुकर कोंढरे, विराज रेणुसे, संदीप फडके, मंगेश साळुंखे, सुनील सोनवणे, संदिप भोसले, शिरीष चव्हाण, मनोज तोडकर व अप्पा रेणुसे मित्र परिवार उपस्थित होते.