Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.च्या माध्यमातून विविध विकासकामे प्रगतीपथावर

महाराष्ट्र 14 न्यूज,(१० जून२०२१) : पिंपरी चिंचवड हे देशातील एक प्रमुख महानगर आहे. पिंपरी चिंचवडची केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशनच्या तिसऱ्या फेरीमध्ये समावेश झाल्यानंतर पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.ची स्थापना करण्यात आली.स्मार्ट सिटी लि.च्या माध्यमातून शहरामध्ये विविध विकासकामांची सुरुवात करण्यात आली आहे.या विकासकामांमुळे शहरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुलभूत सोयीसुविधांची निर्मिती होत असून शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे.

सुरवातीला शहराच्या निवडक भागांमध्ये एरिया बेस्ड डेव्हलपमेंट (ABD) अंतर्गत नवनवीन विकासकामे करण्यात येत आहेत. शहरातील पिंपळे गुरव भागातील जिजामाता उद्यानाच्या सभोवतालच्या परिसराचा कायापालट करण्यात येत आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी नागरिकांना बसण्यासाठी बाक, फूड प्लाझा, सोलर ट्री, इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन, टॉयलेटस इत्यादींची निर्मिती करण्यात येत आहे. येथे येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी वाहनतळ विकसित करण्यात येणार आहे. तसेच संरक्षक भिंतीवर स्टोन क्लॅडींग करण्यात येणार आहे. या परिसरात वृक्षारोपण करण्यात आल्यामुळे सर्व परिसर हिरवाईने नटलेला दिसणार आहे.

Google Ad

पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर या परिसरात विविध ठिकाणी कॉंक्रीटचे रस्ते, फुटपाथ, वाहनतळ, उद्याने तसेच आकर्षक पथदिव्यांची कामे करण्यात येत आहेत. याबरोबरच काही भागांत थीम वॉल पेंटिंग करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत भिंतींवर आकर्षक चित्रे काढण्यात येणार आहेत. तसेच या भागात असणाऱ्या सैन्यदलाच्या कार्यक्षेत्रातील भिंतीचे बांधकामदेखील सुरु करण्यात आले आहे. नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी लवकरच ओपन जिमची निर्मिती करण्यात येणार आहे. याबरोबरच पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी सोयीसुविधा विकसित करण्यात येणार आहेत. तसेच भविष्यामध्ये शहरात भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी पूर्वतयारी म्हणून इलेक्ट्रिक डक्ट तयार करण्यात येत आहेत. सायकल ट्रॅक, स्मार्ट टॉयलेटस , ट्री प्लांटेशन, चौकांचे सुशोभीकरण अशी विविध विकासकामे सुरु आहे तसेच रुंद रस्त्यांवरील कमर्शिअल आस्थापनेच्या समोर प्लाझा डेव्हलोपमेंटचे काम करण्यात येणार आहे यामध्ये प्लेसमेकिंग, नागरिकांना बसण्यासाठी बाक अश्या विविध कामाचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये पॅन सिटी प्रकल्पांतर्गत स्मार्ट पर्यावरण,सिटी वाय फाय,व्हेरीएबल मॅसेज डिस्प्ले,सिटी सर्व्हेलन्स, स्मार्ट वॉटर, स्मार्ट सिवेज, स्मार्ट कीऑस , ऑप्टिकल फायबर केबलिंग, इंटीग्रेटेट कंट्रोल आणि कमांड सेंटर अशा विविध लोकोपयोगी प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाअंतर्गत पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप हे मागील एक वर्षांपासून नागरिकांसाठी कार्यरत आहे आणि शहरातील लाखो नागरिक या सुविधेचा लाभ घेत आहेत. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या या विकासकामांमुळे शहराचा राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटणार आहे. अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

76 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!