Google Ad
Editor Choice

वैष्णव काटे फौंडेशनच्या वतीने भोसरी पोलिस स्टेशन मधील पोलिस बांधवांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२०जुलै) : : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पिंपरी विधानसभा आमदार मा. श्री. आण्णासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोडी येथील वैष्णव काटे फाऊंडेशनच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. भोसरी पोलीस स्टेशन मध्ये युवा नेते वैष्णव दत्तात्रय काटे यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांचा कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच गुन्हे शाखेचे जितेंद्र कदम आदी पोलीस बांधवांचा, भगिनींचा कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेचे रक्षण करणाऱ्या भोसरी पोलीस स्टेशन मधील पोलीस बांधवांचा दापोडी येथील युवा नेते वैष्णव दत्तात्रय काटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मुख्य संघटिका सुप्रियाताई काटे, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा अस्मिता ताई कांबळे, ओबीसी सेल शहराध्यक्ष निर्मला माने, अल्पसंख्या अध्यक्ष शिवाजीनगर विधानसभा दिलशाद नाजिम आत्तार, महिला पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्षा वर्षा झपके (काटे), सुशांत डावखर, ऋतिक बनसोडे, कुणाल ऊंडे, पियुष आरगडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Google Ad

कोरोनाच्या काळात योध्दा बनून लढणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील बांधवांचा सामाजिक बांधिलकी जपत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे. गोरगरीब गरजूंना देखील जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ही सेवा यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे युवा नेते वैष्णव काटे यांनी यावेळी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!