Google Ad
Editor Choice india

कोविन अँपवर लसीकरण नोंदणीला सुरुवात … पहिल्या एका तासात 18 वर्षांवरील 35 लाख लोकांची नोंदणी

महाराष्ट्र 14 न्यूज : देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी प्रक्रिया आज, 28 एप्रिलपासून सुरू झाली आहे. मात्र नोंदणी करताना सुरुवातीला तांत्रिक अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे. या पोर्टलवर नोंदणी करताना सुरुवातीला मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागतो. त्यानंतर एक ओटीपी त्या मोबाईल नंबरवर पाठवला जातो, मात्र हा ओटीपी येत नसल्याचं समोर आलं आहे. तसेच अनेक यूजर्सनी साईट ओपन होत नसल्याच्या देखील तक्रारी केल्या आहेत. दरम्यान तांत्रिक अडचणीनंतरही पहिल्या एका तासात कोविन ॲपवर 18 वर्षे वयावरील 35 लाख लोकांनी लसीसाठी नोंदणी केली असल्याची माहिती मिळाली आहे.

▶️काही मिनिटांमध्ये कोविन अ‍ॅपचा सर्व्हर डाऊन

Google Ad

नोंदणी प्रक्रिया चार वाजेपासून कोविन अ‍ॅपवर सुरु झाली. मात्र ही नोंदणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अ‍ॅपचा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर आली. सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी यासंदर्भातील तक्रार नोंदवली असून स्क्रीनशॉर्ट पोस्ट केले जात आहेत. ट्वीटरवर वेटिंग फॉर ओटीपी, ने ओटीपी, स्लॉट, ओटीपीज, अपॉईंटमेंट असे ट्रेंड सुरु आहेत. आरोग्य सेतू तसेच कोविन अ‍ॅपवरुन नोंदणी केली तरी मूळ नोंदणीसाठी कोविनच्या अ‍ॅपवरच नोंदणी करणाऱ्यांना रिडायरेक्ट केलं जात असल्याने कोट्यावधी युझर्स एका वेळी नोंदणीसाठी आल्याने सर्व्हर क्रॅश झालं असल्याची माहिती आहे.

आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली होती की, तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू होईल. नोंदणी अधिकृत वेबसाइट COWIN.GOV.IN वर होईल. 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण 1 मे पासून सुरु होणार आहे.

▶️को-विन (CoWIN) पोर्टल अधिक कार्यक्षम केल्याची माहिती

कोविड 19 लस नोंदणीसाठी को-विन (CoWIN) पोर्टल देखील अधिक कार्यक्षम करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली होती. दररोज एक कोटी नोंदणी या पोर्टलवर स्वीकारली जाणार आहे. यासोबतच दररोज 50 लाख लोकांच्या लसीची नोंद होऊ शकते. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण 1 एप्रिलपासून सुरू केले जात आहे. त्यामुळे नोंदणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे या पोर्टलमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

122 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!