Google Ad
Editor Choice

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सलग ७५ तास लसीकरणाचा पिंपळे गुरव येथील ‘निळू फुले नाट्यगृहात’ प्रारंभ … आज पहिल्याच दिवशी ५ वाजेपर्यंत घेतला ४६७ लाभार्थ्यांनी लाभ!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० सप्टेंबर २०२१) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सलग ७५ तास लसीकरण मोहीमे अंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी संगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपलिका व 3 M कंपनीच्या संयुक्त विद्यमाने सांगवी येथील निळू फुले नाटयगृह येथे सुरु करण्यात आलेल्या लसिकरण केंद्राचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

Google Ad

आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत कोविड-१९ लसीकरण मोहिम हा चांगला उपक्रम असून या मुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत कोविड-१९ लसीकरण मोठया प्रमाणात होण्यास मदत होईल असे नगरसेविका ‘माधवी राजापुरे’ यांनी मत व्यक्त केले.

यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, नगरसेविका माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, ‘ह’ क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी विवेक थोरात, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, सीएसआर सेलचे विजय वावरे आदी उपस्थित होते.

आपल्या नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे तसेच कोणीही लसीकरणा पासून वंचीत राहू नये या करीता महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येत असून या मोहीमेसाठी वैद्यकिय विभाग खूप मोलाचे काम करीत असलेबाबत महापौर माई ढोरे यांनी समाधान व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निळू फुले नाट्यगृह सांगवी येथे दि. ३० सप्टेंबर २०२१ पासून ०३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सलग ७५ तास नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४६७ लाभार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेतल्याचे दिसून आले. हे लसीकरण २४ तास चालू राहणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानिक लोकप्रतिनिधींनी केले आहे.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी “आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रामांतर्गत दि.३० सप्टेंबर २०२१ ते ०३ ऑक्टोंबर २०२१ या दरम्यान कोरोना प्रतिबधक लसीकरण सलग ७५ तास कोणत्याही स्वरुपाची पर्व नोंदणी न करता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नटसम्राट निळू फुले नाटयगृह, पिंपळे गुरव, रामकृष्ण मोरे नाटयगृह चिंचवड, अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी या तीन ठिकाणी करण्यात आलेले असून शहरामधील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.वर्षा डांगे यांनी केले तर आभार डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी मानले.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

27 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!