Google Ad
Editor Choice

‘हर घर तिरंगा’ अभियानात माजी नगरसेविका ‘उषा मुंढे’ यांच्या कडून … रक्षाबंधनानिमित्त मुस्लिम बांधवांना अनोखी देशाभिमान जपणारी भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ ऑगस्ट) : आज (१२ ऑगस्ट) पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील मस्जिद मध्ये अनोखा सोहळा पहायला मिळाला. देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू आहे. पिंपळे गुरव येथे रक्षाबंधनानिमित्त बहिणीकडून भावास तिरंग्याच्या रूपाने अनोखी देशाभिमान जपणारी भेट देण्यात येत होती. त्यामुळे मुस्लिम समाजातील प्रत्येक बांधवांमध्ये देशाभिमान आणि आनंद दिसत होता.

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात भाजपच्या वतीने घर घर तिरंगा’ या अभियाना मार्फत तिरंगा देण्यात येत आहे. तसेच लक्ष्मण जगताप यांनी कालच सर्वांना घराघरात तिरंगा लावण्यात यावा असे आवाहन केले आहे. आज ( दि.१२ ऑगस्ट) पिंपळे गुरव येथील मस्जिद मध्ये मुस्लिम समाजातील देशबांधवांना माजी नगरसेविका उषा मुंढे यांनी तिरंगा भेट दिला. ही भेट म्हणजे हर घर तिरंगा अभियानातील जनजागृतीचा आदर्श पाठ असल्याचे दिसून आले. यावेळी परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Google Ad

यावेळी बोलताना माजी नगरसेविका ‘उषा मुंढे’ म्हणाल्या, “स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “हर घर तिरंगा” उपक्रम राबविण्याचे ठरवले, शासनातर्फे हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहे. तिरंगा राष्ट्राचा अभिमान व अस्मिता असून,अमृत महोत्सवी वर्ष ऐतिहासिक करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी आपल्या भागात हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी सर्व नागरिकांनी हर घर तिरंगा उपक्रमात उस्फूर्त सहभाग नोंदवावा.

भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७ हा युनायटेड किंगडम (यूके)च्या संसदेने पारित केलेला कायदा होता. ज्यानुसार ब्रिटन शासित भारत देश हा भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र वसाहतींमध्ये विभागला गेला होता. या कायद्याला १८ जुलै १९४७ रोजी ब्रिटन राजघराण्याची संमती मिळाली. त्यामुळे १५ ऑगस्टला भारत आणि १४ ऑगस्टला पाकिस्तान अस्तित्वात आला. आज भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे. त्याचा देशात राहणाऱ्या सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी अभिमान बाळगला पाहिजे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!