Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Pune : दरोड्यासाठी गावठी कट्टा, कोयता, सुरीचा उपयोग … मनसेच्या पदाधिकाऱ्यासह 4 जणांना बेड्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५जुलै) : पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. या पथकाने लोणीकंद परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक केले. पोलिसांनी या टोळीकडून गावठी कट्टा, सुरी, कोयता, दुचाकी असा 1 लाख 15 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी दत्ता गायकवाड (वय 23), गौरव परजणे (वय 20), किशोर जाधव (वय 22), दत्ता व्यवहारे (वय 37, सर्व रा. वाघोली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार अजय माकर (वय 25) फरार झाला आहे. यामधील दत्ता व्यवहारे हा मनसेच्या सहकार सेनेचा उपाध्यक्ष असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई ऋषिकेश व्यवहारे व पोलीस शिपाई ऋषिकेश ताकवणे यांना एक गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार लोणीकंद ते बकोरी रस्त्यावर खंडोबाचा माळ परिसरात टोळके दरोड्याच्या तयारीत थांबले असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन चार जणांना ताब्यात घेतले.

Google Ad

पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये आरोपींकडून गावठी कट्टा, सुरी, मिरचीपूड असा दरोडा टाकण्यासाठी लागणारा ऐवज जप्त केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत. ही कामगिरी पोलीस पुणे शहर आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्रीनिवास घाडगे ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यावेळी प्रत्यक्ष कारवाईमध्ये गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुंडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर यांचा सहभाग होता.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

25 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!