Categories: Uncategorized

भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाचे अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड मनपाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ ऑक्टोबर २०२३) :   भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स २०२३ साठी शहरी वाहतूक विभागांमध्ये नाविन्यपूर्ण विषयांवर काम करणाऱ्या महानगरपालिका, मेट्रो कार्पोरेशन, बस कार्पोरेशन यांच्याकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये संपूर्ण भारतातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विना वाहन वापर ( एन एम टी ) धोरणास व त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेल्या कामांचा समावेश असलेल्या पिंपळे सौदागर परिसर, सांगवी- किवळे रस्ता व नाशिक – फाटा वाकड रस्ता यावरील सायकल मार्ग व पादचारी मार्ग इत्यादी पूरक सुविधा पुरविल्या बाबतची प्रवेशिका २५ ऑगस्ट २०२३ रोजी शहरी विकास मंत्रालयाकडे सादर केली होती.

त्यामध्ये भारतातील अनेक शहरांमधून पिंपरी चिंचवड शहराची निवड होऊन त्या संदर्भातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आज दिनांक २९ ऑक्टोबर २०२3 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस मिळालेबाबत घोषित करण्यात आले. सदरचे पारितोषिक शहरी विकास मंत्रालय भारत सरकार चे सचिव माननीय मनोज जोशी यांचे हस्ते आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिल्ली येथील माणिक शॉ सेंटर येथे आयोजित केलेल्या १६ व्या शहरी वाहतूक विकास परिषदेत स्वीकारले. सदर पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी आयुक्त यांचे समवेत प्रकल्प विभागाचे सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप अभियंता सुनील पवार, आयटीडीपी चे प्रांजल कुलकर्णी तसेच डिझाईन शाळा चे संचालक आशिक जैन उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात जागतिक परिचारीका दिन उत्साहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…

3 days ago

नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेजचा दहावी चा निकाल शंभर टक्के

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…

4 days ago

माॅक ड्रील- पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…

1 week ago

1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, महाराष्ट्र हे नाव कसं आणि कोणामुळे मिळालं? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…

2 weeks ago