Google Ad
Education Maharashtra Pune

परिस्थिती कशीही असो … अंधत्वावर मात करत पुण्याचा ‘जिद्दी’ जयंत मंकले, UPSC मध्ये देशात १४३ वा.!

महाराष्ट्र 14 न्यूज : परिस्थिती कशीही असो…प्रतिकूल वा अनुकूल यश हे तुमच्या मनस्थितीवरच अवलंबून असते. तुमच्यात जिद्द असेल, तर प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही पराभव स्वीकारत नाही हा संदेश दिव्यांग जयंत मंकले याने दिला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षेत मूळचा बीड येथील जयंतने देशात १४३ वी रँक मिळवली. केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) सेवा परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला.

UPSC civil Service साठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून 829 महत्त्वाकांक्षी युवक युवती निवडले गेले आहेत. या परीक्षेत प्रदीप सिंह यांचा देशात पहिला क्रमांकार आहे. तर, जतीन किशोर आण प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधराव्या रँकवर आहे. मात्र यात सगळ्यांचे लक्ष वेधले ते पुण्याच्या जयंत मंकलेनं. महाराष्ट्रातील जयंत मंकले या अंध विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत 143वा क्रमांक पटकावला आहे.

Google Ad

याआधी जयंतने 2018मध्येही लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. मात्र त्यावेळी त्याचा 937वा क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी दोन वर्ष अथक परीश्रम करून पुन्हा परीक्षा दिली, आणि यावेळी त्यांना यश आले. 2018मध्ये यश न मिळाल्यामुळे एक वर्ष जयंत नैराश्यातही होता. मात्र अभ्यास करून जिद्दीनं यंदा जयंतने 143वा क्रमांक मिळवला. जयंतने संगमनेर येथील अमृतवाहिनी महाविद्यालयातून 2013 मध्ये प्रथम श्रेणीत मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर तळेगाव दाभाडे व भोसरी येथे दोन वर्षे मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून नोकरी केली.

या कालावधीत जयंतला ‘रेटिना पिग्मेन्टोसा’ हा असाध्य आजार जडला. त्यामुळे जयंतची दृष्टी कमी कमी होत गेली. जयंतला सुरुवातीपासूनच लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची होती. मात्र IESमध्ये दिव्यांगांना प्रवेश नसतो. त्यामुळे जयंतने शिक्षणाचा उपयोग व्हावा, यासाठी युपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 2015पासून जयंतने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2017मध्ये मुलाखतीपर्यंत जयंत पोहचला होता, मात्र त्याची निवड झाली नाही. अखेर यंदा जयंत 143वा रॅंक मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!