महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी व प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रम मुळशी (पौंड )यु.पी.एस. इंडिया प्रा.लि. व लोकमान्य मेडिकल फौंडेशन चिंचवड आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे आरोग्य विभाग पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
डॉ .वामण गेंगजे (तालुका वैद्यकीय अधिकारी) मुळशी डॉ .जयंत श्रीखंडे (आपत्कालीन व्यवस्थापन विभाग प्रमुख लोकमान्य हॉस्पिटल ) डॉ .विशाल क्षीरसागर (सी .ई .ओ .लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर &रिसर्च सेंटर चिंचवड ) श्रीनिवास पत्तार (संचालक लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटर चिंचवड )डॉ .बीना राजन (उपसंचालीका लोकमान्य रिसर्च सेंटर चिंचवड ) विनायक गुजर (पत्रकार )यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.
उपस्थित आशा वर्कर्स यांना डॉ जयंत श्रीखंडे यांनी आपत्कालीन परिस्थिती कसे प्रथमोपचार करावे याचे प्रात्यक्षिक द्वारे माहिती दिली तसेच आग लागणे साप चावणे भूसंकलन आशा विविध आपत्ती निवारण विषयी माहिती देण्यात आली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहदेव गोळे जनसंपर्क अधिकारी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल पवार राहुल तायडे अदिनी मेहनत घेतली