Google Ad
Uncategorized

मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये खळबळ … तर OBC आरक्षणच रद्द होऊ शकते ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० जानेवारी) : मराठा आरक्षणाचबाबत  सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे विरुद्ध ओबीसी नेते असा वाद आता टोकाला पोहचला आहे. अशात आता मनोज जरांगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या  विरोधातच न्यायालयात याचिका दाखल करून ओबीसी आरक्षणच रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

छगन भुजबळ  यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाला होणाऱ्या विरोधाला पाहता जरांगे यांनी हा इशारा दिला आहे. मनोज जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये खळबळ उडाली आहे.

Google Ad

दरम्यान याबाबत बोलतांना जरांगे म्हणाले की, आम्हाला ओबीसी बांधवांच्या लेकरांचं वाटोळ करायचं नाही. गोरगरिबांच्या मुलांच्या ताटात माती कालवायची नाही. मात्र, तो (छगन भुजबळ) जर आमच्या अन्नात माती कालवत असेल, तर तुमचं वाटोळं त्याच्यामुळे होत असल्याचं गाव खेड्यातील ओबीसी बांधवांनी समजून घ्यायला पाहिजे. नाईलाजाने मला ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावे लागेल. कारण त्यांचा सुद्धा कोणताही अहवाल स्वीकारलेला नाही. आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास हे आणून द्यावा लागेल. त्यामुळे त्यांचा देखील देशातील संपूर्ण 27 टक्के आरक्षण रद्द होऊ शकते. हे फक्त त्याच्या एकट्यामुळे (छगन भुजबळ) एवढ्या लोकांचा वाटोळं होऊ शकतं, असे जरांगे म्हणाले.

पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की,”आमचं हक्काचा आरक्षण आहे. आमच्या कुणबी नोंदी सापडल्या आहे. त्यामुळे आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत. त्यामुळे आमच्या अन्नात त्याने माती कालवण्याचं प्रयत्न करू नये. गाव खेड्यातील ओबीसी बांधवांनी त्याला हे समजून सांगावं. अन्यथा ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हालाही नाईलाजाने याचिका दाखल करून हे आरक्षण रद्द करावे लागणार आहे आणि ते रद्द देखील होणार असल्याचा,” दावा जरांगे यांनी केला आहे.

आमच्या कालच्या कायद्यामुळे ओबीसी समाजातील सर्वच सगेसोयऱ्यांना देखील फायदा होणार आहे. आमची नियत खराब नाही, अन्यथा सगेसोयरे कायदा फक्त मराठा समाजापुरता केला असता. गोरगरीब ओबीसींचा कल्याण होत असेल तर होऊ द्या अशी आमची भावना आहे. पण, त्याचं तसं नाही, तो झालाय पागल, त्याच्यामुळे ओबीसींनी त्याच्या नादी लागू नये अशी माझी विनंती असल्याचं जरांगे म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!