Google Ad
Editor Choice

‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांच्या स्थानिक विकास निधीतून अद्यावत रुग्णवाहिकेचे … भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ जानेवारी) : उच्चतम् श्रेणीची अत्याधुनिक रुग्णवाहिका आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष ‘चंद्रकांतदादा पाटील’ यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज पीडब्लूडी मैदानात आमदार चषक क्रिकेट सामन्यांच्या समारोपाच्यावेळी करण्यात आले.

गोरगरीब रुग्णांच्या रुग्णसेवेसाठी रुपये १० लाख किंमतीच्या या सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आले. यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ पिंपरी चिंचवड च्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, पक्षनेते नामदेव ढाके, शिक्षण समितीच्या सभापती माधवीताई राजापुरे, मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप, अंबरनाथ कांबळे, उषाताई मुंढे, नगरसेवक सागर अंगोळकर, हर्षल ढोरे, सविताताई खुळे, शारदा सोनवणे, महेश जगताप, राजेंद्र राजापुरे, मनीष कुलकर्णी, अजय दूधभाते, निलेश जगताप आणि पदाधिकारी उपस्थितीत होते.

Google Ad

आमदार लक्ष्मण जगताप यांनी आजपर्यंत अनेक मोठी महा आरोग्य शिबिर पिंपरीचिंचवड शहरात घेतली असून “जनसेवा हीच ईश्वर सेवा” मानत शहरातील गरीब रुग्णांना मदतीचा हात दिला, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून, तसेच शहरात करोनाचा वाढता उद्रेक पाहता आपल्या परिसरातील रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या भावनेने ही  रुग्णवाहिका महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागास उपलब्ध करून दिली.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!