Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आठही प्रभाग समित्यांच्या सभापती पदावर या पुरुष नगरसेवकांनीच मारली बिनविरोध बाजी …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २९ ऑक्टोबर २०२१) :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आठही प्रभाग समित्यांच्या सभापती पदावर बिनविरोध निवड झाली आहे.  शैलेश मोरे (अ प्रभाग), सुरेश भोईर (ब प्रभाग), राजेंद्र लांडगे (क प्रभाग), सागर आंगोळकर (ड प्रभाग), विकास डोळस (इ प्रभाग), कुंदन गायकवाड (फ प्रभाग), अभिषेक बारणे (ग प्रभाग) आणि अंबरनाथ कांबळे (ह प्रभाग) अशी सभापतीपदी निवड झालेल्या नगरसदस्यांची नावे आहेत.

महापालिकेच्या आठही प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी आज निवडणूक होती.  या निवडीसाठी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील मधुकर पवळे सभागृहात प्रभागांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.  पुणे विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधी म्हणून पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी सभेचे  पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.  प्रत्येक प्रभाग समिती सभापती पदाच्या  निवडीवेळी सभा शाखा सचिव म्हणून त्या त्या प्रभागाच्या क्षेत्रीय अधिका-यांनी काम पाहिले.

Google Ad

निवडीवेळी सभागृहात अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सिताराम बहुरे, रविकिरण घोडके, विजयकुमार थोरात उपस्थित होते.

नवनिर्वाचित प्रभाग समिती सभापतींचे महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे तसेच उपस्थित नगरसदस्यांनी अभिनंदन केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!