Categories: Editor Choice

पिंपळे सौदागर मध्ये ‘उन्नती सोशल फाउंडेशन’ आणि ‘शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन’ आयोजित ” … स्वरामृत दिवाळी पहाट ” ही आनंद , उत्साह अन् जल्लोषात साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ ऑक्टोबर) : आम्ही विठ्ठलाचे वारकरी , दिन गेले भजनाविना सारे ‘ या गजरात अख्ये पिंपळे सौदागर न्हाऊन निघाले . उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आयोजित ” स्वरामृत दिवाळी पहाट ” ही आनंद , उत्साह अन् जल्लोष सर्वत्र नावीन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई संपन्नतेचे प्रतीक घेऊन आली . पिंपळे सौदागरवासियांच्या उपस्थितीत आपल्यासुरेल आणि जादुई आवाजाने लहान – थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणान्या गायकांच्या स्वरसुरांनी दीपोत्सवाचे आगमन झाले . त्यांच्या गायनात रसिक ओले अक्षरक्षः भारावून गेले .

एका पेक्षा एक सरस अशी भक्ती आणि भावगीत सादर करून सारेगमप लिटल चॅम्प्स उपविजेता सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे सुप्रसिद्ध गायक संगीतकार कल्याणजी गायकवाड , ‘ सारेगमप ‘ महाविजेती सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड , सुप्रसिद्ध पाश्व गायिका अनुराधा पटवर्धन यांनी रसिकांची प्रत्येक गाण्याला दाद मिळवली . तब्बल सात मिनिटे विठ्ठलाचा गजर सुरू राहिल्याने परिसराला प्रतिपंढरीचे स्वरूप आले होते .

हा कार्यक्रम दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शनिवारी धनत्रयोदशीला ( दि . २२ ) आणि रविवारी ( दि . २३ ) रोजी पहाटेप वाजतागोविंदयशदाचौकातील लिनिअरगार्डनमध्ये सलग दोन दिवस उत्साहात पार पडला . यावेळी आयोजक उन्नती सोशल फाऊंडेशन आणि भारतीय जनता पार्टी , चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे , मा . नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे , उदयोजक संजयशेठ मिसे , हभप पुरुषोत्तम महाराज पायगुडे , शेखर महाराज जांभूळकर , सुप्रसिद्य मांडेल अनुक्षा गाडेकर , सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई मुंडे , पीके इंटरनेशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे , उदयोजक वसंत काटे , जयनाथ काटे , विजयभिसे , भानुदासकाटे , सुरेशकुंजीर , विलासकाटे , विकास काटे , शशी काटे , अतुल पाटील , शाम कुंजीर , राजेंद्र जयस्वाल व जेष्ट नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते .

आयोजक कुंदाताई भिसे म्हणाल्या , गेल्या अनेक वर्षापासून उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागरमध्ये संगीत दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात येत आहे . मागील दोन वर्षांत कोविड परिस्थितीमुळे कार्यक्रम होऊ शकला नाही . यंदा ” स्वरामृत दिवाळी पहाट “ या कार्यक्रमाचे गेली दोन दिवस आयोजन करण्यात आले . पिंपळे सौदागर परिसरातील सोसायटी वर्गाने या कार्यक्रमास हजेरी लावत शोभा वाढविली . यापुढेही असेच सांकृतिक कार्यक्रम राबविणार आहे .

कुटे म्हणाले , संगीताची जननी ही शास्त्रीय संगीत असून तिची जपवणूक करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे . जसे मंदीर , गड किल्ले जोपासले जातात तसे शास्त्रीय संगीत जोपासले जावे . संगीत वेदऋयामधून आलेली भाषा आहे . रागाची बिजे शास्त्रीय संगीतात दडली असून , ही कला टिकविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे . ” गजर विठ्ठलाचा ” या या गीताने दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाल प्रारंभ झाला . कैसे रिजादू अब मन को या राग भूपाल , त्यानंतर जगदंबी का अंबिका हे देवीवरील भक्तीगीत सादर केले . जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आधी रचलीपंढरीमग वैकुंठ नगरीया अभंगाला रसिकांनी भरभरून दाद दिली .

त्यानंतर ठाई ठाई विठ्ठल , आम्ही विठ्ठलाचे वारकरी , दिन गेले भजनाविना सारे , सूरत पिया दिन नि बिसराये मन हे राम रंगी रंगले , झिली रे झिनी चदरीया है . स्वरचित चीज प्रसुत केली . रसिकांच्या फर्माईश्वर त्यांनी हे सूरांनो चंद्र व्हा हे नाटयपदानंतर कानडा राजा पंढरीचा या भक्तीगीताने कार्यक्रमाची सांगता केली . या गाण्यातील शेवटविठ्ठलाच्या गजराने केला .

यात रसिकांनीही तितकीच दाद देत विठ्ठलाचा तब्बल पाच सात मिनीटे नामघोष केला . जणू की येथे पंढरीच अवतरली असे वातावरण बनले . स्वरामृत दिवाळी पहाट कार्यक्रमात सुप्रसिध्द गायक आणि गायिका यांना संगीत संयोजक गणेश गायकवाड , व्हायोलीन वादक अपूर्व गोखले , हार्मोनियम प्रविण कासलीकर , तबला किशोर कोरडे , पखवाज राजेंद्र बधे , बासरी निलेश बुंदे , निवेदक दयानंद घोटकर , पुजा धीगळे यांनी साथ केली . या कार्यक्रमात साथसंगत करणान्यांना रोपटे भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला . उद्योजक संजयशेठ मिसे व पिंपळे सौदागर मधील ग्रामस्थांनी आभार मानले .

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

18 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago