Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नागरिकांच्या आरोग्यासाठी ‘नगरसेवक रोहितआप्पा काटे’ यांचे अनोखे मिशन … दापोडी परिसरात केले स्वखर्चाने धुरीकरण!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि ६ मे) : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा मोठ्या संख्येने वाढत असताना महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठीच्या कामात व्यस्त आहे. दुसरीकडे मात्र महापालिका क्षेत्रामध्ये वाहणाऱ्या नद्यांमधील वाढत्या जलपर्णीमुळे सध्या नदी किनारी वसलेल्या दापोडीमध्ये मोठ्या प्रमाणात डासांची पैदास झाली असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे, अटींचे पालन करून जनजागृतीबरोबर नागरिकांना सोयी-सुविधा देण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आरोग्य प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र सध्या डासांचे साम्राज्यही दापोडी परिसरात ठिकठिकाणी वाढू लागल्याने नव्या रोगांना आमंत्रण दिल्यासारखे होत आहे. याच गोष्टींची दखल घेत प्रभाग क्रमांक ३० दापोडीचे ‘नगरसेवक रोहितआप्पा काटे’ यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता स्वखर्चाने दापोडी परिसरात डासांची पैदास रोखण्यासाठी धुरीकरणाचे कार्य हाती घेत धुरीकरण केले.

Google Ad

एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मलेरिया, डेंग्यूसारख्या भयानक आजाराने डोके वर काढायला सुरुवात केली, तर परिसरातील नागरिकांना याचा मनस्ताप होऊ शकतो. महापालिका औषध फवारणी करून मच्छरांचा नायनाट करत आहे, परंतु आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने आपण संपूर्ण प्रभागात धुराची गाडी फिरवून धुरीकरण करून दापोडी परिसरातील जनतेच्या आरोग्यासाठी हे कार्य करत असल्याचे नगरसेवक रोहितआप्पा काटे यांनी सांगितले.

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!