Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सांगवी पोलिसांचा अनोखा फंडा … सांगवीमध्ये गस्त घालताना चक्क पोलीस अधिकारी व कर्मचारी सायकलींवर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ मे) : पोलीस आयुक्तांकडून सांगवी पोलीस स्टेशनला आठ सायकली प्रतिबंधात्मक गस्त घालण्यासाठी देण्यात आल्या आहेत. सांगवी पोलीस या सायकलींवर गेली तीन दिवसांपासून परिसरात सायंकाळी आठ ते नऊ प्रतिबंधात्मक गस्त घालताना दिसून आले.

आपल्याला नेहमीच पोलीस दुचाकीवरून, चारचाकी वाहनांमधून फिरताना दिसून येत असतात. मात्र अचानक चक्क पोलीस अधिकारी व कर्मचारी सायकलींवर गस्त घालताना दिसल्यास आचर्य वाटायला नको! तीन दिवसांपासून पहिल्यांदाच गल्ली बोळातील पोलिस पाहिल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले.

Google Ad

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ब्रेक द चैन नियमावली नुसार संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र अनेक नागरिक विनाकारण घराच्या बाहेर पडत आहेत. या ना त्या कारणाने रस्त्यांवर फेरफटका मारत आहेत. दुचाकीवर ट्रिपल सीट बसून बिनधास्त वावरत आहेत. तर काही जण मास्क न लावता फिरत आहेत. याला कुठेतरी चाप बसला पाहिजे, त्यामुळेच ही अनोखी शक्कल लढवली जात आहे.

विनाकारण घरा बाहेर पडणाऱ्याना सांगवी पोलिस गुरुवारी सायंकाळी बडगा उगरताना दिसून आले. यावेळी गल्ली बोळातून रस्त्यांवरून, चौकातून चक्क सायकलींवर बसून गस्त घालताना दिसून आले. जुनी सांगवी येथील, बँक ऑफ महाराष्ट्र, मधूबन, महापालिका उद्यान, शितोळे चौक, गजानन महाराज मंदिर परिसर, शिवामृत चौक याठिकाणी गस्त घालण्यात आली होती.

पोलिसांचे शारिरीक स्वास्थ्य उत्तम रहावे यासाठी देण्यात आलेल्या या सायकलींचा सांगवी पोलीस नक्कीच वापर करतील. आयुक्तांचा हा उपक्रम स्तुत्य असल्या कारणाने पोलीसांचे आरोग्य स्वास्थ यामुळे जोपासले जाईल आणि निरोगी राहील हे ही नक्की. या सायकली प्रतिबंधात्मक गस्त घालण्यासाठी देण्यात आल्या आहेत. अजय भोसले, गुन्हे पोलीस निरीक्षक सांगवी यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

50 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!