महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ जानेवारी) : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, खासदार धनंजय महाडिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील, एकनाथ खडसे, माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री दतात्रय भरणे, पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी येऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसेच आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप आणि कुटुंबियांचे गुरूवारी (दि. ५) सांत्वन केले.
आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे मंगळवारी (३ जानेवारी) रोजी निधन झाले. त्याच दिवशी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय व सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वन केले जात आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, एकनाथ खडसे यांच्यासह सर्वांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. घरातील सर्वांची विचारपूस करत दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.28ऑगस्ट :-- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंंदोलक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.28 ऑगस्ट : पिंपळे गुरव येथील श्री गजानन महाराज यांची ११५ वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २७ ऑगस्ट २०२५:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना सक्षम आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी : दि. २६ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सवाची तयारी सध्या जल्लोषात सुरू असून…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, दि. २६ ऑगस्ट २०२५ :* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 ऑगस्ट :- कुत्रे पाठीमागे लागल्यामुळे नवी सांगवीतील एक महिला गाडीवरून…