Google Ad
Editor Choice

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जानेवारी) : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे ०३ जानेवारी रोजी निधन झाले. आज बुधवार (दि. २५) खासदार रामदास आठवले यांनी पिंपळे गुरव येथील निवासस्थानी येऊन जगताप कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

त्यांच्या समवेत आर पी आय जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, माजी महापौर सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष स्वप्नील कांबळे, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, अंबरनाथ कांबळे,विलास मेडगिरी, सागर अंगोळकर, चंद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब भागवत आर पी आय उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र हेही उपस्थित होते. आठवले यांनी जगताप कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच जगताप यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांची आस्थेवाईकपणे चौकशी देखील केली. या दुःखातून सावरण्यासाठी जगताप कुटुंबाला धीर दिला. दिवंगत लक्ष्मणभाऊ यांच्यासोबतच्या काहीजुन्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. यावेळी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप व बंधू शंकर जगताप, विजय जगताप तसेच मित्रमंडळी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!