महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० सप्टेंबर) : केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री (भारत सरकार) नितीन गडकरी यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. भाजपा मा. नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणि देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला.
त्याप्रसंगी माजी महापौर माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, निवडणूक प्रमुख चिंचवड विधानसभा शंकर जगताप, माजी अध्यक्ष प्राधिकरण नवनगर विकास सदाशिव खाडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी,उपाध्यक्ष भाजपा पिंपरी चिंचवड .शेखर चिंचवडे, माजी नगरसेविका उषाताई मुंढे, निर्मलाताई कुटे, माधवीताई राजापुरे, माजी नगरसेवक .सुरेश भोईर, सामाजिक कार्यकर्ते .हरिभाऊ चिंचवडे, राज तापकीर व इतर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

गडकरी यांनी आज पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील रस्त्यांची पाहणी केली. राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील चांदणी चौक ते रावेत/किवळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. तसेच वडगाव उड्डाणपूल, मुठा नदीवरील पूल, वाकड जंक्शन, भूमकर चौक, रावेत चौक या भागातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महामार्गाची दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.