Google Ad
Uncategorized

शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तोफ धडाडणार: * भूमकर वस्ती येथील द्रौपदा लॉन्स येथे सायंकाळी ४ वाजता होणार सभेला प्रारंभ

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा उद्या (दि. १६ ) भूमकर चौक येथील द्रौपदा लॉन्स याठिकाणी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.

या सभेला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले) यांच्यासह मित्रपक्ष महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Google Ad

या सभेसाठी महायुतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीच्या मुख्य समस्येवर या सभेत नितीन गडकरी काय बोलणार याकडे चिंचवडकरांचे लक्ष असणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!