Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

एक पाऊल भविष्यासाठी … पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून … नवी सांगवी आणि पिंपळे गुरव येथे लोकप्रतिनिधींनी केले वृक्षारोपण!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६जून) : कोरोना झालेल्या अनेक जणांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी अनेकजण सरसावलेले आपण पाहिले. मात्र निसर्गनिर्मित ऑक्सिजन मिळावा याकरिता वृक्षारोपण हा एकमेव पर्याय आहे. वृक्षारोपण करताना केवळ शोभेची झाडे लावण्यापेक्षा मुबलक प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करणे काळाची गरज आहे. ही गरज ओळखून आज ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करताना समाधान वाटले असे प्रतिपादन माजी ‘नगरसेवक शंकरशेठ जगताप’ यांनी केले.

२६ जून २०२१ रोजी ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवी येथील स्वामी विवेकानंद नगर येथे वाघजाई मंदिर ते फेमस चौक या नवीन झालेल्या ६० फुटी सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कडेने तसेच पिंपळे गुरव मधील स्मार्ट सिटी अंतर्गत कृष्णा चौक ते निळू फुले नाट्यगृहाच्या रस्त्याच्या कडेने माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Google Ad

यावेळी स्थानिक नगरसेवक अंबरनाथ कांबळे, नगरसेविका माधवी राजापुरे, नगरसेविका सीमा चौगुले, माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजपुरे, गणेश सहकारी बँकेचे संचालक रावसाहेब चौगुले, अभिमन्यू गाडेकर, भाऊसाहेब जाधव, ज्ञानेश्वर गोरे, रशीद पठाण, शहाजी पाटील राजु नागणे, प्रशांत माटूर, सचिन महाडिक, शरद डुंबरे, हरीचंद्र गायके, बाबासाहेब चितळकर, चंद्रकांत बेंडे, श्रीकांत पवार, बाळा खुंटे, श्यामराव धस, मधुकर पवार, राजबाबू सरकनिया, संदीप दरेकर, जाधव अंकल आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सुंदर अशा वृक्षांच्या रोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.

दिवसेंदिवस कमी होणारे पावसाचे प्रमाण लक्षात घेता जास्तीत जास्त झाडे लावणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे.
तसेच पर्यावरण रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता एक चळवळ बनली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवून पर्यावरण रक्षण व वृक्षारोपण करून निसर्गाचे संगोपन केले पाहिजे. असे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ हे नेहमीच सांगतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच नवी सांगवी पिंपळे गुरव चा होणारा विकास पाहता भविष्यात ही नगरी खरोखरच स्मार्ट सिटी झाल्याशिवाय राहणार नाही. याला गरज आहे ती नागरिकांच्या सहकार्याची …

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!